दहशतवाद्यांना पकडून द्या, सरकारी नोकरी मिळवा; काश्मीर पोलिसांची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 04:11 PM2019-03-27T16:11:22+5:302019-03-27T16:12:37+5:30

किश्तवाड पोलिसांनी शहरभर या दहशतवाद्यांचे पोस्टर लावले आहेत.

give information of terrorists, get government jobs; Offers of Kashmir Police | दहशतवाद्यांना पकडून द्या, सरकारी नोकरी मिळवा; काश्मीर पोलिसांची ऑफर

दहशतवाद्यांना पकडून द्या, सरकारी नोकरी मिळवा; काश्मीर पोलिसांची ऑफर

googlenewsNext

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमुळे जम्मू-काशमीर पोलीस सतर्क झाले आहेत. यादरम्यान दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टरही जारी केले असून त्यांच्याबद्दल माहिती पुरविणाऱ्यास मोठे बक्षिस म्हणून सरकारी नोकरी दिली जाणार आहे. 


किश्तवाड पोलिसांनी शहरभर या दहशतवाद्यांचे पोस्टर लावले आहेत. दहशतवाद्यांची माहिती देणे, त्यांना जिवंत अथवा मृत पकडून दिल्यास लाखो रुपयांचे बक्षिसही देण्याची घोषणा केली आहे. 


या पोस्टरमध्ये एकूण 7 दहशतवाद्यांचे फोटो आहेत. यामध्ये एचएम गटाचा दहशतवादी मोहम्मद अमीन उर्फ जहांगिर सहभागी आहे. 
याशिवाय पोस्टरमध्ये रियाझ अहमद, ओसामा बिन जावेद, मुदस्सिर हुसेन, तालिब हुसेन, जमालदीन आणि जुनेद अक्रम यांची नावे आहेत. जो व्यक्ती या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे बॅनरमध्ये म्हटले आहे. 

Web Title: give information of terrorists, get government jobs; Offers of Kashmir Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.