कॉलेजला येता की ब्युटी कॉन्टेस्टला - राज्यपालांचा मुलींना हितोपदेश

By Admin | Updated: January 9, 2016 14:39 IST2016-01-09T14:33:37+5:302016-01-09T14:39:33+5:30

तुम्ही कॉलेजला येता की ब्युटी कॉन्टेस्टला असं विचारत कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुलींच्या फॅशनेबल वागण्यावर टिप्पणी केली आहे

The girl gets the beauty contest for the girl's daughter | कॉलेजला येता की ब्युटी कॉन्टेस्टला - राज्यपालांचा मुलींना हितोपदेश

कॉलेजला येता की ब्युटी कॉन्टेस्टला - राज्यपालांचा मुलींना हितोपदेश

>ऑनलाइन लोकमत
बेंगळूर, दि. ९ - तुम्ही कॉलेजला येता की ब्युटी कॉन्टेस्टला असं विचारत कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुलींच्या फॅशनेबल वागण्यावर टिप्पणी केली आहे. कॉलेजमध्ये येण्यासाठी आयब्रो करणं, लिपस्टिक लावणं, केशरचना करणं आवश्यक नसल्याचं सांगताना वजुभाई वालांनी कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यासाला येता, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला आहे. 
मैसूर महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे उद्गार काढले आहेत.
काहीतरी कमावण्यासाठी कशाचा तरी त्याग करावा लागतो असं सांगताना मुलांनी व्यसनांचा त्याग करावा तर मुलींनी फॅशनचा नाद सोडावा असा सल्ला वजुभाईंनी दिला.

Web Title: The girl gets the beauty contest for the girl's daughter