कॉलेजला जाण्याचे सांगून तरुणी गायब

By Admin | Updated: May 29, 2016 18:31 IST2016-05-29T18:31:16+5:302016-05-29T18:31:16+5:30

जळगाव: कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून गेलेली १९ वर्षीय तरुणी गायब झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुटी आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता या तरुणीने मी कॉलेजला जावून येते असे घरात सांगितले, मात्र ती परतलीच नाही. दोन दिवस प्रतिक्षा व शोधाशोध केल्यानंतर तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी तालुका पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

The girl disappeared by asking to go to the college | कॉलेजला जाण्याचे सांगून तरुणी गायब

कॉलेजला जाण्याचे सांगून तरुणी गायब

गाव: कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून गेलेली १९ वर्षीय तरुणी गायब झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुटी आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता या तरुणीने मी कॉलेजला जावून येते असे घरात सांगितले, मात्र ती परतलीच नाही. दोन दिवस प्रतिक्षा व शोधाशोध केल्यानंतर तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी तालुका पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पत्नीशी वाद झाल्याने पतीने सोडले घर
जळगाव: पैशावरुन पत्नीशी वाद झाल्याने पतीने घर सोडल्याची घटना निमखेडी शिवारातील साई नगरात घडली आहे. याप्रकरणी पत्नी संगिता संदीप साळुंखे यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पत्नी संगिता व पती संदीप मधुकर साळुंखे (वय ४३) यांच्यात १७ एप्रिल २०१६ रोजी पैशावरुन वाद झाला होता. त्यातून मी पैसे घेवून येतो असे सांगून संदीप घरुन गेले ते परतच आले नाहीत. त्यानंतर २४ एप्रिल रोजी दुपारी त्यांनी पैसे जमले नाहीत, मी दोन, तीन दिवसात येतो,असे पत्नीला फोन करुन सांगितले. मात्र अद्यापपर्यंत ते घरी न आल्याने परिवारात चिंता वाढली आहे.

Web Title: The girl disappeared by asking to go to the college