शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:34 IST

Ghaziabad Jeweler Murder: गाझियाबाद येथील मोदीनगरमध्ये दिवसाढवळ्या ७५ वर्षीय ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या करण्यात आली.

गाझियाबाद येथील मोदीनगर परिसरात दिवसाढवळ्या ७५ वर्षीय ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी पाठलाग करून आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने ही क्रूर कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांच्या मनात भिती पसरली आहे.

पीडित गिरधारी लाल असे हत्या करण्यात आलेल्या ज्वेलर्सचे नाव असून त्यांचे मोदीनगर परिसरात गिरधारी लाल अँड सन्स ज्वेलरी नावाचे दुकान आहे. दरम्यान, गिरीधारी यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दुकान उघडले. काही वेळातच आरोपी अंकित गुप्ता हा मंकी कॅप घालून त्यांच्या दुकानात घुसला आणि त्याने काउंटरवर चढून गिरीधारी यांच्यावर धारदार शस्त्राने १० पेक्षा जास्त वेळा वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गिरीधारी यांचा जागीच मृत्यू झाला. 

खेळण्यातील बंदूक दाखवून पळ

गिरीधारी यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून रुपेंद्र सोनी याने दुकानात धाव घेतली आणि अंकितला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याने खेळण्यातील बंदूक दाखवून तिथून पळ काढला. पण रुपेंद्रने त्याचा पाठलाग केला. परिसरातील इतर दुकानदारांच्या मदतीने दुकानापासून सुमारे २५-३० मीटर अंतरावर आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित गुप्ता याच परिसरात राहत होता आणि त्याचे कुटुंब स्थलांतरित झाल्यापासून तो आर्थिक तणावाखाली होता. अंकितला माहिती होते की, गिरीधारी यांचे मोठे दागिन्यांचे व्यवसाय आहेत. त्याने सुमारे एक आठवडाभर दुकानाची रेकी केली होती आणि गुरुवारी सकाळी ग्राहक नसताना हल्ला करण्याचा कट रचला. आरोपीने ऑनलाईन चाकू खरेदी केला. महत्त्वाचे म्हणजे, हल्ल्यापूर्वीच्या पाच दिवसांत त्याने युट्यूबवर २५ हून अधिक दरोड्यांचे व्हिडिओ पाहिले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ghaziabad: Jeweler Murdered in Robbery Attempt After YouTube-Inspired Plot

Web Summary : Ghaziabad jeweler, Girdhari Lal, murdered in his shop by Ankit Gupta, who planned the robbery after watching YouTube videos. Gupta, facing financial issues, was arrested after locals caught him fleeing. He stabbed Lal multiple times after reconnaissance of the shop.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीghaziabad-pcगाझियाबाद