शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

गीता भारतात तर परतली, पण पालकांबाबत संदिग्धता कायम

By admin | Updated: October 26, 2015 16:17 IST

चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली गीता १५ वर्षांनी भारतात परतली खरी, मात्र माहतो कुटुंबिय आपले खरे पालक नसल्याचे तिने सांगितल्याने तिच्या पालकांबाबत अद्याप संदिग्धता आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली गीता  १५ वर्षांनी भारतात परतली खरी, मात्र माहतो कुटुंबिय आपले खरे पालक नसल्याचे तिने सांगितल्याने तिच्या पालकांबाबत अद्याप संदिग्धता आहे. मात्र असे असले तरी माहतो कुटुंबिय व गीता यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होऊ शकेल, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. 
तब्बल १५ वर्षांनी मायदेशी परतणा-या गीताचे आज सकाळी ईधी कुटुंबियांसह कराचीहून दिल्लीत आगमन झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते. आज दुपारी तिने सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर स्वराज यांनी पत्रकार परिषद घेत गीताच्या भारत आगमनाचा घटनाक्रम विशद केला.
देशातील चार राज्यातील चार कुटुंबांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला होता, तेव्हा आम्ही त्यांच्याकडून फोटो घेऊन ते गीतासमोर सादर केले, मात्र तिने त्यांना ओळखण्यास नकार दिला. मात्र माहतो कुटुंबाचा फोटो तिने ओळखला आणि ती भारतात आली. इतकी वर्ष गीताचा मुलीप्रमाणे सांभाळ केल्याबद्दल मी ईधी कुटुंबियांचे मनापासून आभार मानते आणि गीताला भारतात पाठवण्यासाठी त्वरित कारवाई करत, कागदपत्रांची पूर्तता केल्याबद्दल मी पाकिस्तानच्या अधिका-यांची अतिशय आभारी आहे, असे स्वराज यांनी सांगितले. 
भारतात परतल्यावर गीता व माहतो कुटुंबियांची भेट झाली असली तरी ते आपले पालक नसल्याचे गीताने म्हटले आहे. माझे लग्न झाले नसून पाकिस्तानात गेले तेव्हा मी खूप लहान होते, असेही गीताने सांगितले आहे. आम्ही गीता व माहतो कुटुंबियांची डीएनए टेस्ट करणार असून तोपर्यंत गीताला इंदौर येथील एका संस्थेत पाठवण्यात येणार असे स्वराज यांनी सांगितले. डीएनए चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यास परिस्थिती थोडीशी क्लिष्ट होईल, पण आम्ही गीता व माहतो कुटुंबियांना समोरासमोर बसवून चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. गीताच्या कुटुंबियांचा शोध लागो किंवा न लागो ती भारताची मुलगी असून आम्ही तिची काळजी घेऊ असे स्वराज म्हणाल्या.