शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये शहीदांचा अपमान, गणवेश आढळला कचरा पेटीत

By admin | Updated: December 4, 2014 12:36 IST

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे गणवेश कचराकुंडीत फेकल्याचा संतप्त प्रकार उघड झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

रायपूर, दि. ४ - शहीद जवांनाचा सन्मान करायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असले तरी त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये शहीदांचाच अपमान झाला आहे. दोन दिवसांपूर्वी  नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे गणवेश कचराकुंडीत फेकल्याचा संतप्त प्रकार उघड झाला आहे. 
सोमवारी छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे १४ जवान शहीद झाले होते. या जवानांचे पार्थिव रायपूरमधील आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले होते. याच रुग्णालयात सर्व शहीद जवानांचे शवविच्छेदनही झाले. वीरपुत्राला गमावलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रतापच रुग्णालय प्रशासनाने केला. या शहीद जवानांचे गणवेश व बुट कचराकुंडीमध्ये फेकण्यात आले होते. रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी हा प्रकार बघितला व त्याचे छायाचित्र काढून प्रसारमाध्यमांमध्ये दिले. यानंतर छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कचराकुंडीजवळ फेकलेले गणवेश सन्मानपूर्वक उचलून प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात नेले. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना गणवेश सुपूर्त करण्याची विनंती केली. मात्र नेत्यांनी नकार दिला. अखेर सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी काँग्रेस कार्यालयात गेले व त्यांनी या जवानांचे गणवेश ताब्यात घेतले.