शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

ज्याची भीती होती तेच झाले...! बिहारमध्ये पेट्रोल ५ रुपयांनी महागले; डिझेलच्या किमतीतही ३ रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:41 IST

Petrol Diesel Price Hike Latest news: बिहारमध्ये इंधन दरवाढीचा भडका! प्रीमियम पेट्रोलनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार? जाणून घ्या नवे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि मध्यपूर्वेतील तणावाचा थेट परिणाम आता बिहारमधील इंधन दरांवर दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत प्रीमियम पेट्रोल आणि इंडस्ट्रियल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर, आता सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. 

गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेल आणि कर संरचनेतील बदलांमुळे ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या दरवाढीमुळे पेट्रोलने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, पेट्रोलमध्ये प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत १०५.३५ रुपयांवरून आता ११०.३५ रुपये झाली आहे. तर डिझेलमध्ये प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुनी किंमत ९१.५८ रुपयांवरून आता ९४.५८ रुपये झाली आहे.

मालवाहतूक आणि प्रवासावर परिणाम
डिझेलच्या किमतीत ३ रुपयांनी वाढ झाल्यामुळे ट्रक, टेम्पो आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम फळे, भाजीपाला आणि धान्याच्या किमतीवर होऊ शकतो. तसेच, बस आणि रिक्षा भाड्यातही वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत आधीच प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. मात्र, सर्वात मोठा फटका इंडस्ट्रियल डिझेलला बसला असून, त्याच्या किमतीत प्रति लिटर २२ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटका
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि मध्यपूर्वेतील (इराण-अमेरिका) तणावामुळे इंधन आयातीचा खर्च वाढला आहे. यामुळे येणाऱ्या काळात किमतीत आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Fuel Prices Surge: Petrol Up ₹5, Diesel Up ₹3

Web Summary : Bihar sees sharp fuel price hike. Petrol increased by ₹5, now ₹110.35 per liter, diesel up ₹3 to ₹94.58. Transportation costs will rise affecting commodity prices and the common man's budget due to international crude oil prices and Middle East tensions.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढFuel Crisisइंधन टंचाईIranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPetrolपेट्रोलDieselडिझेल