शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा एन्ट्रो...

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

फसव्या आश्वासनापुढे शेतकऱ्यांनी वाजवल्या ताट-वाट्या

नवी मुंबई : कोकण भवनमधील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनामध्ये शुक्रवारी काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मतदार यादीमधील गोंधळावरून ही भांडणे झाली.
बेलापूर मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी शुक्रवारी कोकणभवनमधील दालनामध्ये सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येणार्‍या प्रारूप मतदार यादीमध्ये त्रुटी राहू नयेत, जास्तीत जास्त पारदर्शकपणे यादी तयार व्हावी यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती. या बैठकीमध्ये वाशीमधील काँगे्रसचे कार्यकर्ते विजय वाळुंज यांनी त्यांच्या प्रभागामधील बोगस नावे वगळण्यात यावीत अशी मागणी केली. त्याचवेळी याच प्रभागातील राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक राजू शिंदे यांनीही मतदार याद्या अद्ययावत झाल्या पाहिजेत याविषयी भूमिका मांडली. दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चेदरम्यान मतभेद विकोपास गेले. कार्यकर्त्यांनी हातवारे करून एकमेकांविरोधात बोलण्यास सुरवात केली. काहींनी शिवीगाळही केली व खुर्च्या उचलून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी कल्पना जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हे भांडण सुरू होते. अखेर इतर राजकीय पदाधिकार्‍यांनी दोन्ही बाजूच्या पदाधिकार्‍यांना अडवून शांत केले, अन्यथा कोकणभवनमध्ये तुंबळ मारामारी झाली असती. मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी आयोजित पहिल्याच बैठकीत एवढा गोंधळ झाल्यामुळे यापुढे जाहीरपणे सर्वांना बोलावून मीटिंग होण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी)
चौकट
आम्हाला बोलू दिले जात नव्हते
युवक काँगे्रसचे बेलापूर मतदार संघाचे अध्यक्ष विजय वाळुंज यांनी सांगितले की, आमच्या प्रभागात मोठ्याप्रमाणात बोगस मतदार आहेत. त्यांची यादी आम्ही दिली असून ती वगळण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. निवडणुका पारदर्शी होण्यासाठी बोगस मतदार वगळणे आवश्यक आहे. मीटिंग दरम्यान नगरसेवक आम्हाला आमचे मत मांडून देत नव्हते.आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यामुळे भांडण झाले.

विनाकारण भांडण केले
नगरसेवक राजू शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, काँगे्रसच्या पदाधिकार्‍यांनी विनाकारण भांडण केले व आम्हाला अपशब्द वापरले. मतदार याद्यांमधील त्रुटी सुधारून त्या अद्ययावत कराव्या ही आमचीही मागणी आहे. पत्ते व इतर चुका सुधारल्या पाहिजेत. परंतु बोगस मतदार व स्थलांतरित मतदार यामध्ये फरक असतो हेही समजून घेतले पाहिजे.