शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आशा कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By admin | Updated: March 24, 2015 23:49 IST

आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकार्‍यांना निवेदन

आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकार्‍यांना निवेदननाशिक : आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी स्वरूपात नियुक्त केलेल्या महिला आशा कर्मचार्‍यांच्या विविध समस्या व मागण्यांवर तसेच पोषण आहारासाठी नियुक्त केलेल्या महिला बचतगटांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धरणे नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना व आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे व प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आशा महिला कर्मचार्‍यांना गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही, कागदपत्रांसाठी तसेच विविध दाखल्यांच्या छायांकित प्रत काढण्यासाठी पदरमोड करावा लागतो यासह विविध मागण्यांचा पाढाच यावेळी संघटनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांच्यापुढे मांडला. त्यावर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुटू शकणार्‍या समस्या व मागण्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन डॉ. वाकचौरे यांनी दिले. तसेच शासनस्तरावरील मागण्यांबाबत शासनाकडे अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांना त्यांच्या विभागाशी निगडीत विविध समस्या व मागण्यांचे निवेदन दिले. तसेच पोषण आहारासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनात कल्पना शिंदे, मीराबाई सोनवणे, साधना झोपे, लीलावती लांडगे, गीता पासी, लताबाई टिळे यांच्यासह महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)