Former Andhra Pradesh Speaker, Kodela Siva Prasada Rao commits suicide in Hyderabad | आंध्र प्रदेश विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी केली आत्महत्या

आंध्र प्रदेश विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी केली आत्महत्या

ठळक मुद्देआंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी  कोडेला शिव प्रसाद राव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले.

हैदराबाद - आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या केली आहे. सोमवारी (16 सप्टेंबर) राहत्या घरी गळफास घेत कोडेला यांनी आत्महत्या केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी  कोडेला शिव प्रसाद राव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. आपण राव कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 

कोडेला हे सहा वेळा खासदार होते आणि विभाजनानंतर आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1985 मध्ये माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीही होते. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यानंतर कोडेला यांचे पुत्र आणि कन्येविरुद्ध भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असताना विधानसभेच्या सभागृहातील टेबल-खुर्च्या आपल्या मुलाच्या शोरुममध्ये पोहोचवण्याचा कोडेला यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Former Andhra Pradesh Speaker, Kodela Siva Prasada Rao commits suicide in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.