शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:51 IST

Neha Singh Rathore News: आपल्या बिनधास्त आणि आक्रमक राजकीय भूमिका आणि वक्तव्यांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणारी प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठोड हिच्यासमोरील अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

आपल्या आक्रमक राजकीय भूमिका आणि वक्तव्यांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणारी प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठोड हिच्यासमोरील अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नेहा सिंह राठोड हिचा शोध घेण्यासाठी वाराणसी पोलीस लखनौ येथील तिच्या निवासस्थानी पोहोचली होती. मात्र तिथे ती सापडली नाही. त्यानंतर पोलीस नोटिस तिच्या घराच्या दारावर चिकटवून माघारी फिरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनरल डायर म्हटल्याने भाजपाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी वाराणसीमध्ये नेहा सिंह राठोड विरोधात ५०० हून अधिक तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच या प्रकरणी लंका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याच प्रकरणी लखनौ पोलिसांसोबत वाराणसी पोलीस नेहा सिंह राठोडच्या सुशांत गोल्फ सिटीच्या सेलिब्रिटी गार्डन्स अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटवर गेले होते. 

याबरोबर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या कथित चिथावणीखोर पोस्टप्रकरणी नेहा सिंह राठोडविरोधात लखनौमध्ये एक गुन्हा नोंद झालेला आहे. लखनौ पोलीससुद्धा जबाब नोंदवण्यासाटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी दोन वेळा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आतापर्यंत ती जबाब नोंदवण्यासाठी आलेली नाही. दुसरीकडे हजरतगंज पोलिसांनीही नेहा सिंह राठोड हिला दोन वेळा नोटिस बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र ती हजर झालेली नाही.

या दरम्यान, नेहा सिंह राठोड हिने कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र ती कोर्टातही जबाब नोंदवण्यासाठी आलेली नाही. सूत्रांच्या मते दोन शहरांमधील पोलीस तिला पकडण्यासाठी धाडी घालत आहेत. तसेच तिला लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.  नेहा सिंह राठोड ही आपली गाणी आणि सोशल मीडिया पोस्टमधून सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक मते व्यक्त करत असतेल. त्यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडते. आता या प्रकरणी नेहा सिंह राठोड हिचं अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.   

English
हिंदी सारांश
Web Title : Bhojpuri singer Neha Singh Rathore missing? Police searching.

Web Summary : Bhojpuri singer Neha Singh Rathore, known for her political views, is reportedly missing. Police are searching for her in connection with multiple complaints and cases filed against her regarding her statements. She hasn't responded to police notices.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी