शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

Tirupati Stampede : मला श्वास घेता येत नव्हता, असं वाटलं की, आम्ही सर्वजण मरणार..."; तिरुपतीत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:51 IST

Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिरुपती बालाजी मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एजन्सीनुसार, दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शी डी व्यंकट लक्ष्मी यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितलं की, "पाच मिनिटांसाठी मला असं वाटत होतं की, आम्ही सर्वजण मरणार आहोत. मी गेल्या २५ वर्षांपासून मंदिरात येत आहे आणि असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. घटना घडली त्यावेळी, सहा मुलांनी मला बाजूला ओढलं आणि प्यायला पाणी दिलं"

"मी ओरडत होते, गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती"

"लोक पुढे धावत होते आणि मी जिथे उभी होते तिथे सुमारे १० लोक एकत्र पडले. मी ओरडत होती की मी पडतेय पण तरीही लोक मागून धक्का देत होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. मला बराच वेळ श्वासही घेता आला नाही. जर पोलिसांनी भाविकांना सुव्यवस्थित पद्धतीने पुढे जाऊ दिलं असतं तर ही आपत्ती टाळता आली असती. त्यावेळी लोकांना काय घडतंय ते समजत नव्हतं."

"मी सकाळी ११ वाजता मंदिरात आले आणि संध्याकाळी ७ वाजता गेट उघडला"

दुसऱ्या एका भक्ताने सांगितलं की, त्या सकाळी ११ वाजता मंदिरात आल्या होत्या आणि संध्याकाळी ७ वाजता दार उघडण्यात आलं. एका व्यक्तीने सर्वांना घाई करू नका आणि रांगेत चालायला सांगितलं, पण कोणीही ऐकत नव्हतं. पोलीस बाहेर होते, आत नव्हते. ५,००० भाविकांच्या उपस्थितीबद्दल पोलिसांना आधीच माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी अचानक गेट उघडला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली असा दावा एका भक्ताने केला आहे.

तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत पत्नी हरवली, व्हायरल व्हिडिओमुळे मृत्यूची बातमी समजली

तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. बरेच जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे.  व्यंकटेश हे त्यांची पत्नी शांती आणि मुलासोबत तिरुपतीला गेले होते. वैकुंठ एकादशीनिमित्त मंदिरात भव्य दर्शन घेण्यासाठी ते खूप उत्सुक होते. मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा शेवटचा एकत्र प्रवास असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. विशेष दर्शनाचं टोकन मिळविण्यासाठी विष्णू निवासमजवळ रांगेत उभ्या असलेल्या शेकडो लोकांमध्ये व्यंकटेश यांचं कुटुंबही होतं.  

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट