शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

पंजाबमधील बाटला शहर भीषण स्फोटाने हादरलं; 23 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 10:08 AM

बटाला शहरात झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी होती की घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला.

बटाला - पाकिस्तान सीमेनजीक असणाऱ्या गुरुदासपूर येथील बटाला शहरात बुधवारी भीषण स्फोट झाला. फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाने संपूर्ण शहर हादरुन गेलं. यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

या घटनेत फटाक्यांचा कारखान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तसेच आसपासच्या इमारतींमध्येही मोठं नुकसान झालं आहे. घटनास्थळी सध्या प्रशासनाकडून मलबा काढण्याचं काम सुरु आहे. बचावकार्य सुरु असतानाही याठिकाणी स्फोट झाले. त्यामुळे पोलीस आणि जवानांही धोका निर्माण झाला आहे. मलब्यात आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे जवान शोधकार्य करत आहेत. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेकांची या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेची न्यायलयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. 

स्फोटाची तीव्रता अधिक बटाला शहरात झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी होती की घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला. कारखान्यात उभी असणारी कार 300 मीटर दूर फेकली गेली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या 2 युवकांचा जळून मृत्यू झाला. 200 मीटर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. या स्फोटानंतर घटनास्थळावर रात्री उशिरापासून बचावकार्य सुरु आहे. 

या कारखान्याच्या मालकाचे 5 कुटुंब सदस्यही मलब्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. स्फोटात मालकाचा आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार स्फोट प्रचंड भयंकर होता. पीडित लोक स्फोटामुळे दूरवर फेकले गेले. स्फोटामुळे सगळे नागरिक घराबाहेर पडले. घटनास्थळावर आरडाओरडा सुरु झाला. 

हा कारखाना बटालाजवळील हंस ली पुल येथे आहे. ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा मोठ्या संख्येने कर्मचारी कारखान्यात हजर होते. मलब्यातून आतापर्यंत 31 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.   

टॅग्स :Blastस्फोटPunjabपंजाब