शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सतत तणाव असलेल्या कोर्टात विनोदी काय घडले ते कळणार; दिल्ली हायकोर्टाचा नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 06:45 IST

ई- मेल आयडीवर मिळालेल्या पोस्ट नियुक्त समितीद्वारे तपासल्यानंतर संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : न्यायालयीन कामकाज म्हणजे गंभीर प्रक्रिया. जिथे न्यायाधीश चेहरा सरळ ठेवण्यासाठी धडपडत असतात तर वकील आणि साक्षीदार भांडणात गुंतलेले असतात; पण कोर्टातील ताणतणाव दूर करण्यात विनोद महत्त्वाची भूमिका बजावते. त्याला महत्त्व देत दिल्लीउच्च न्यायालयाच्या वेबसाइटला लवकरच एक नवीन पृष्ठ जोडण्यात येत आहे ज्यावर  न्यायदान कक्षातील अनपेक्षित विनोदी क्षणांच्या कथा वाचायला मिळतील.

या उपक्रमांत त्यांच्या वेबसाइटवर एक विशेष विभाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे सुनावणीदरम्यान अनुभवलेल्या कोर्टरूममधील विनोदी घटना, संवाद पोस्ट केल्या जातील. कोर्टरूम हे विनोदाचे सुपीक स्रोत असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. यासाठी विशेष ई मेल आयडी तयार केला आहे. वकील, याचिकाकर्ते, साक्षीदार कोर्टरूममध्ये घडलेल्या मजेदार घटना आणि विनोदी देवाण-घेवाण यावर पाठवू शकतात. ई- मेल आयडीवर मिळालेल्या पोस्ट नियुक्त समितीद्वारे तपासल्यानंतर संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.वेबसाइटवरील विभाग अद्याप पूर्णपणे कार्यान्वित व्हायचा आहे, तथापि त्यात आतापर्यंत पाच विनोद प्रसिद्ध केले आहेत. यापैकी एक स्वतः न्यायाधीशांनीच लिहिला आहे.

वरिष्ठ वकील ‘क्ष’ : न्यायमूर्ती महोदयांनी कृपा करून आता पेपर बुकच्या पान ६ वर यावे आणि डाव्या स्तंभावरील तारा (स्टार) पाहावा.न्यायमूर्ती - मिस्टर क्ष, मला तारे फक्त संध्याकाळी ७ नंतर आकाशात दिसतात. तुम्ही ज्याचा संदर्भ देत आहात तो ‘ताऱ्याचे चिन्ह’ आहे.(६ सप्टेंबर रोजी न्या. राजीव शकधर यांनी शेअर केलेली पोस्ट.)

नियमित गोंधळादरम्यान, विनोद अनपेक्षितपणे वाढतो. कधी वकील किंवा न्यायाधीशाच्या बुद्धीमुळे तर कधी वादी, प्रतिवादी किंवा साक्षीदाराच्या टिप्पणीमुळे विनोद घडतात. ‘ह्युमर इन कोर्ट’ हा दिल्ली कोर्टाच्या माहिती तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस कमिटीचा प्रकल्प आहे. गंभीर सुनावणीतील विनोदी क्षणांचे भावी पिढीसाठी जतन करण्याचा उद्देश यामागे आहे. (दिल्ली हायकोर्ट पोर्टल)

टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय