शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

"बॅग भरा आणि घरची वाट धरा," कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याची ऑन द स्पॉट हकालपट्टी

By बाळकृष्ण परब | Published: January 12, 2021 11:26 PM

Manish Sisodia at Labour Office : एका कामचुकार अधिकाऱ्याला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दणका दिला आहे.

नवी दिल्ली - कर्तव्यात कसूर करणाऱ्या, कामचुकारपणा, दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासन प्रशासनामध्ये कमतरता नाही. आता अशाच एका कामचुकार अधिकाऱ्याला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दणका दिला आहे. मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी उत्तर-पश्चिम दिल्लीतील कामगार कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये अनियमितता दिसून आली. त्यामुळे सिसोदिया यांनी कार्यालयाच्या व्यवस्थापकाची तडकाफडकी हकालपट्टी केली.बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर सिसोदिया यांनी या कार्यालयाला अचानक भेट दिली. य भेटीवेळी केलेल्या निरीक्षणात डझनभर प्रकरणांमध्ये अनियमितता दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ बरखास्त केले. नोंदणीदरम्यान प्रक्रियेचे उल्लंघन करण्यापासून ते कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून महिलेऐवजी पुरुषाचे फोटो लावण्यासारख्या चुका होत असल्याच्या तक्रारी दिसून आल्या.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मनीष सिसोदिया संबंधित अधिकाऱ्याला खडसावताना दिसत आहेत. गरीब लोक रांगेत उभे आहेत आणि तुम्ही इथे पैसे खावून उलट-सुलट काम करत आहात. आता असे करा ती बॅग भरा आणि घरी जावा, असे मनीष सिसोदिया यांना संबंधित अधिकाऱ्याला सांगितले.दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी निरीक्षणादरम्यान, कामगार अधिकाऱ्यांना कामगारांची नोंदणी आणि कल्याणासंबंधीची सर्व कामे नियमानुसार आणि निश्चित वेळेत करण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

टॅग्स :delhiदिल्लीIndiaभारत