श्रद्धांजली सभेत राडा, महिलांचा सहभाग असून हाणामारीचा व्हिडीओ व्हयरल  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 09:35 PM2020-07-11T21:35:31+5:302020-07-11T21:36:55+5:30

कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम व्हावा असं एका बाजूच्या लोकांचं म्हणणं होतं तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचं कार्यक्रम भव्य व्हावा असं वाटत होतं.त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आणि हाणामारीत रूपांतर झालं.

Fighting women participated in the tribute meeting and the video of the fight went viral | श्रद्धांजली सभेत राडा, महिलांचा सहभाग असून हाणामारीचा व्हिडीओ व्हयरल  

श्रद्धांजली सभेत राडा, महिलांचा सहभाग असून हाणामारीचा व्हिडीओ व्हयरल  

Next
ठळक मुद्दे श्रद्धांजली कार्यक्रमाच्या आधी याबाबत लोक फक्त चर्चा करत होते. चर्चा करता करता वाद निर्माण झाला आणि वादाचं रुपांतर भांडणात. भांडण एवढं विकोपाला गेलं की लोकांनी लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली.

श्रद्धांजली सभेत राडा, महिलांचा सहभाग असून हाणामारीचा व्हिडीओ व्हयरल  
गुजरात - एका व्यापाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एका श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. मात्र त्या शोकसभेत  राडा झाल्याने लोकांमध्येच तुंबळ हाणामारी सुरू झाली. सुरतमध्ये ही घटना घडली आहे. सुरतमध्ये एका श्रद्धांजली सभेत कार्यक्रम सुरू होण्याअगोदर लोकांमध्ये वादविवाद झाला. किती लोकांनी जमावं यावर चर्चा सुरू होती. कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम व्हावा असं एका बाजूच्या लोकांचं म्हणणं होतं तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचं कार्यक्रम भव्य व्हावा असं वाटत होतं.त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आणि हाणामारीत रूपांतर झालं.

श्रद्धांजली कार्यक्रमाच्या आधी याबाबत लोक फक्त चर्चा करत होते. चर्चा करता करता वाद निर्माण झाला आणि वादाचं रुपांतर भांडणात. भांडण एवढं विकोपाला गेलं की लोकांनी लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली. या हाणामारीत सामील झाल्या होत्या हे विशेष, या हाणामारीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यामुळे श्रद्धांजली सभा झालीच नाही. श्रद्धांजली आयोजकांची बदनामी मात्र झाली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन  करण्याचं आवाहन केलं जात असताना जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असं वारंवार सांगितलं जात आहे.गुजरातमध्ये सुरत हा हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण याच शहरात सापडत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

 

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं 

 

Web Title: Fighting women participated in the tribute meeting and the video of the fight went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.