शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजघराण्यातील वादातून गोळीबार

By admin | Updated: September 15, 2014 03:30 IST

अमेठीच्या भूपती भवनचे वारसदार आणि काँग्रेसचे खासदार संजय सिंग आणि त्यांची पत्नी गरिमा सिंग यांच्यात वारसा हक्कावरून सुरू असलेल्या वादाने रविवारी हिंसक वळण घेतले

अमेठी : अमेठीच्या भूपती भवनचे वारसदार आणि काँग्रेसचे खासदार संजय सिंग आणि त्यांची पत्नी गरिमा सिंग यांच्यात वारसा हक्कावरून सुरू असलेल्या वादाने रविवारी हिंसक वळण घेतले. भूपती भवनाबाहेर संजय सिंग यांचे पुत्र अनंत विक्रमसिंग आणि पोलीस यांच्यात झालेल्या तुफान संघर्षात पोलीस कॉन्स्टेबल मारला गेला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली.या हिंसाचारात सामील असलेल्या १८ जणांना अटक करण्यात आली आहे आणि संपूर्ण परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. संपूर्ण घटनेचे व्हिडियो चित्रण करण्यात आले आहे. ते पाहिल्यावर आणखी काही लोकांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक हिरालाल यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे खासदार संजय सिंग आणि त्यांची पत्नी अमिता अमेठीला येणार असल्याचे कळल्यावर अनंत विक्रम सिंग यांचे समर्थक भूपती भवनासमोर गोळा झाले. अनंत विक्रम यांनी आपली आई व संजय सिंग यांची पहिली पत्नी गरिमा यांच्यासोबत या भूपती भवनाचा आधीपासूनच ताबा घेतलेला आहे. संजय सिंग आणि त्यांची दुसरी पत्नी अमिता आणि अनंत विक्रम सिंग व गरिमा यांच्या दरम्यान वारसाहक्कावरून वाद सुरू आहे.वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलेले खासदार संजय सिंग हे पत्नी अमिता यांच्यासोबत भूपती भवन येथे पोहोचले. यावेळी अनंत विक्रम यांच्या समर्थकांनी या दोघांनाही भवनात प्रवेश करण्यापासून रोखले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला तेव्हा जमाव व पोलीस यांच्यात संघर्ष उडाला. या दरम्यान जमावातून गोळीबार करण्यात आला, ज्यात विजय मिश्रा (४५) हा पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला. (वृत्तसंस्था)