शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या मानसिकतेतून बाहेर पडून संघर्ष करा!

By admin | Updated: February 8, 2015 01:28 IST

राज्यातील भाजपा सरकारला १०० दिवसांत एकही आश्वासन पाळता आले नाही. राज्यात सत्तेत असणाऱ्यांना आपण अजून सत्तेत आहोत, असे वाटत नाही.

पुणे : राज्यातील भाजपा सरकारला १०० दिवसांत एकही आश्वासन पाळता आले नाही. राज्यात सत्तेत असणाऱ्यांना आपण अजून सत्तेत आहोत, असे वाटत नाही. पण आपण मात्र सत्तेत असल्याप्रमाणे वागतो. सत्ताधारी असल्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे, असा आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी केले. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते शनिवारी बालेवाडी क्रीडा संकूल येथे झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, माजीमंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, नवाब मलिक, मधुकर पिचड, खा़ सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून १५ वर्षे सत्तेत होता़ पहिल्यांदा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे अद्याप नेते व कार्यकर्त्यांची मानसिकता तयार होत नाही. परंतु, सरकारने नऊ महिन्यांत कोणत्या अच्छे दिनच्या बाळाला जन्म दिला. त्याची माहिती घेऊन संघर्ष करा, असे आवाहन पटेल यांनी केले. विधिमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण, स्मार्ट व्हिलेज आणि न्याय व्यवस्थेच्या सुधारणासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढील काळात आंदोलने केली पाहिजेत, असा सल्ला त्रिपाठी यांनी दिला. आपल्या पक्षाचा संघर्ष सत्ताधाऱ्यांबरोबर आहे.आपल्या पक्षाची बांधणी व्यक्ती केंद्रीत न होता, पक्ष म्हणून संघटन झाले पाहिजे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मुस्लीम आरक्षणाविषयी दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे एमआयएमचे ओवैसी नावाचे भूत तयार झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करीत आहेत, अशी टीका नवाब मलीक यांनी केली.