शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

आयात केलेला कांदा सडून जाण्याची भीती; दर कमी झाल्याने राज्यांकडून मागणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 06:37 IST

तुर्कस्तान, इजिप्त, अफगाणिस्तानातून ३६ हजार टन कांदा आयात

नवी दिल्ली : देशात कांद्याचे भाव किलोला १५० रुपयांपर्यंत पोहोचल्यावर केंद्र सरकारने तुर्कस्तान, इजिप्त व अफगाणिस्तान या देशांमधून ३६ हजार टन कांदा आयात करण्याची तजवीज केली. परंतु हा परदेशी कांदा प्रत्यक्ष भारतात पोहोचेपर्यंत नवे पिक तयार होऊन देशी कांदाच ५० रुपये किलो या दराने उपलब्ध होऊ लागल्याने आता आयात केलेला कांदा मागणीअभीवी सडून जाण्याची भीती खुद्द केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनीच मंगळवारी येथे व्यक्त केली.

पासवान म्हणाले की, केंद्र सरकारने वाहतूक खर्च स्वत: सोसून आयात केलेला कांदा ५५ रुपये किलो या दराने देण्याची तयारी दर्शविली. परंतु स्थानिक बाजारांत देशी कांद्याचे दर याहून कमी असल्याने आयात केलेला कांदा घ्यायला राज्य सरकारे उत्सुक नाहीत.केंद्र सरकार फक्त आयात करण्याची व्यवस्था करू शकते. पण त्या मालाचे किरकोळ वितरण करण्याची जबाबदारी राज्यांचीआहे.

आता राज्येच कांदा घ्यायला तयार नाहीत, त्याला केंद्र सरकार काय करणार?, असे सांगत मंत्री म्हणाले की, कांदा हा नाशिवंत माल असल्याने तो ठराविक दिवसांत वापरला नाही तर सडून जाईल. मग जनतेचे पैसे वाया घालवले म्हणून काही लोक कोर्टात जातील.स्थानिक कांदा स्वस्त होण्याखेरीज आयात कांद्याची वेगळी चव आणि स्वाद लोकांना पसंत न पडणे हेही आयात कांद्याला उठाव नसण्याचे आणखी एक कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी सांगितले की, परदेशात मागणी नोंदविल्यापैकी १८,५०० टन कांदा आतापर्यंत देशत आला आहे. परंतु आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगण, उत्तर प्रदेश व प. बंगाल यासारख्या काही मोजक्या राज्य सरकारांनी यापैकी जेमतेम दोन हजार टन कांदा आतापर्यंत घेतला आहे. आणखी काही राज्यांनी आधी नोंदविलेली मागणी रद्द केली आहे.श्रीवास्तव पुढे म्हणाले की, देशात मागणी नाही हे पाहिल्यावर ज्याची जहाजे अद्याप रवाना झालेली नाहीत अशा पाच हजार टन कांद्याची परदेशातील मागणी रद्द करण्यात आली आहे. मात्र जी जहाजे आधीच रवाना झाली आहेत त्यातून दोन हजार टन कांदा येत्या दोन दिवसांत व आणखी १४,५०० टन कांदा या महिनाअखेर भारतात पोहोचेल. त्याचे काय करायचे असा सरकारपुढे प्रश्न आहे.

टॅग्स :onionकांदाIndiaभारत