शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

'वडिलांचा बूट अन् आईची बांगडी सापडली, शरीर जळून राख झालेले', संभल पीडिताची अपबाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:07 IST

संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीत 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला.

UP Sambhal : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल चर्चेत आले आहे. प्रशासनाला या ठिकाणी अनेक पुरातन मंदिरे आणि बारव सापडल्यामुळे संभलची देशभरात चर्चा सुरू आहे. 1978 साली याच संभलमध्ये जातीय हिंसाचार झाला होता, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, तेव्हापासून आतापर्यंत अनेक मंदिरांवर अतिक्रमण करण्यात आले होते. पण, आता प्रशासनाने बहुतांश मंदिरे खुली केल्यामुळे 1978 च्या दंगलीतील पीडित एक एक करत पुढे येत आहेत आणि त्यांच्या वेदनादायक जगासमोर मांडत आहेत. 

दंगलीत आई-वडिलांना गमावलेगुलाब सिंह सांगतात की, 1978 साली ते 20 वर्षांचे होते. नखासा परिसरात त्यांच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. वडिलांचे नाव किशन सिंह आणि आईचे नाव नरेनिया होते. दंगलीच्या आगीत दोघेही जळून खाक झाले. गुलाब सिंग आई-वडिलांचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी गेले असता, त्यांना फक्त वडिलांचे बूट आणि आईची बांगडी सापडली. आजूबाजूला फक्त राख होती. इतक्या निर्घृण हत्येनंतरही गुलाब सिंह यांचा एफआयआर नोंदवण्यात आला नाही. त्या हत्याकांडाच्या कटू आठवणी त्यांच्या मनात आजही घर करुन आहेत. वृद्ध गुलाबसिंग आजही ते दृश्य आठवून थरथर कापतात.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?गुलाब सिंह यांनी 'आज तक'शी संवाद साधताना सांगितले की, त्या दिवशी आई-वडील भाचीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. यावेळी अचानक दंगल सुरू झाली, ज्यामुळे बाजारात चेंगराचेंगरी झाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण जवळच्या कारखान्यात लपले. मात्र दंगलखोरांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला आणि लपलेल्या सर्वांना तलवारीने कापले अन् जाळून मारले. अनेकांचे मृतदेहही हाती आले नाही, हाती आली ती फक्त राख... 

दंगलीनंतर संभलमध्ये 72 तासांचा संचारबंदी लागू करण्यात आला होता, आम्ही कुठेही जाऊ शकत नव्हतो. नंतर त्याच कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून मला माहिती मिळाली की, माझ्या आई-वडिलांचाही दंगलीत मृत्यू झाला आहे. जीव मुठीत ठेवून मी कारखान्यात गे,लो तेव्हा मला माझ्या वडिलांचा एक बूट आणि माझ्या आईची एक बांगडी सापडली. त्यांच्या शरीराची राख झाली होती. 1978 च्या दंगलीत एकूण 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला. आज लोकसंख्या 45 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस