शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

देशात धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे: फारूक अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 2:12 PM

Assembly Elections 2021: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारूक अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देफारूक अब्दुल्ला यांची सरकारवर टीकादेशात धर्माच्या नावावर राजकारण केले जात असल्याचा आरोपममता दीदींसोबत काम करण्यासाठी ५० लाखांची ऑफर मिळाल्याचा दावा

जम्मू : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय वातावरण आणखी तापताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ((PM Narendra Modi)) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशातच आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारूक अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी मोठे विधान केले आहे. एका मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून ममता दीदींसोबत काम करण्यासाठी ५० लाख रुपयांची ऑफर दिली, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. (farooq abdullah claimed a chief minister offered fifty lakh rupees to work with mamata banerjee)

उधमपूर येथील ग्रामीण भागाचा दौरा करताना बट्टलबालियां भागात एका सभेला संबोधित करताना फारूक अब्दुल्ला यांनी सदर दावा केला आहे. ०५ ऑगस्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक, तरुण रोजगारासाठी तळमळत आहेत. तर, दुसरीकडे दहशतवाद फोफावत चालला आहे, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक

एका मुख्यमंत्र्याची ऑफर

विरोधक राजकारणासाठी कोणत्याही पातळीवर जात आहेत. देशात धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सकडून कधीही धर्माच्या नावावर राजकारण केले गेले नाही. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांपूर्वी एका मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. पाच तारखेला कोलकाता येथे जायचे असल्याचे तो म्हणाला. आपण एकत्रित मिळून ममता दीदींसोबत काम करूया. या बदल्यात ५० लाख रुपये देतो, अशी ऑफर दिली. ही गोष्ट ऐकून मी हैराण झालो, असा एक किस्सा फारूक अब्दुल्ला यांनी सांगितला.

आरक्षणाच्या नावावर विभाजनाचा डाव

आरक्षणाच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये विभाजनाचा डाव असल्याचा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी यावेळी केला. विरोधकांकडून विभाजनकारी रणनिती राबवली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, फारूक अब्दुल्ला यांची खासदारकी रद्द करून देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच फेटाळली. याचिकाकर्ता आरोप सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना दंडही ठोठावण्यात आला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाMamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूक