शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपटणार; केंद्र सरकारपुढे दुहेरी अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 02:23 IST

नव्याने चर्चा करण्याची मागणी, कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या 

हरीश गुप्तानवी दिल्ली : दोन महिन्यांपासून दिल्ली सीमेवर चालू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी एकीकडे पंतप्रधान कार्यालय संबंधित मंत्रालयासोबत उसंत न घेता काम करीत असताना देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहितांच्या अमलबजावणीविरुद्ध जोरदार आवाज उठविला आहे.

शेतकरी आंदोलनामुळे सरकारच्या अन्य प्रमुख सुधारणांना खीळ बसते की काय? अशी स्थिती उद्‌भवलेली असताना १३ पैकी १० प्रमुख कामगार संघटनांनी चार कामगार संहिता लागू करण्यासाठी नवीन नियम निश्चित करण्याची प्रक्रिया रोखण्याची आणि द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय सल्लामसलतीच्या भावानेतून नव्याने चर्चा करण्याची मागणी केली आहे. इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सीटू, एआययूटीयूसीसह दहा कामगार संघटनांनी उपरोक्त मागणी केली आहे. केंद्रीय कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता या कामगार संहिता संसदेत मंजूर करण्यात आल्या, असा कामगार संघटनांचा आरोप आहे. या संहिता ५० कोटी श्रमशक्तींशी (कामगार, कर्मचारी) संबंधित आहेत.

कृषि कायदे ज्या प्रकारे केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २०१९ मध्ये मंजूर केली, त्याचप्रमाणे कामगार संहिता मंजूर केल्या; परंतु, कामगार संघटना आणि सर्वसंबंधितांशी चर्चा करुन कामगार मंत्रालयाने नियम केल्यानंतरच कामगार संहितांची अमलबजावणी केली जाईल, अशी हमी देत सरकारने पेचप्रसंग टाळण्याचा प्रयत्न केला होता.  विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित भारतीय मजदूर संघाने केंद्रीय कामगार मंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन कंत्राटी कामगारांचे रक्षण करण्याची मागणी केली. कामगार संहितेतून ठेकेदारांना राज्य कामगार विमा आणि कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास बाध्य करावे. या संघटनेचाही चार कामगार संहितेमधील अनेक तरतुदींना विरोध आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी कामगार संहिता अमलबजावणीची तारीख ठरविणे लांबणीवर टाकले आहे.

कामगार संहितेचा प्रवास जानेवारी २०२१ : कामगार मंत्रालय चालू महिन्याच्या अखेरीस कामगार संहितेनुसार नियम अंतिम करणार२०१९ : औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थितीसंबंधित चार कामगार संहिता मंजूर२०१५ : कामगार मंत्रालयाने सध्याचे ४४ केंद्रीय कामगार कायदे चार संहितेत एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. नवीन कामगार संहिता मंजूर करण्यासाठी चार वर्षे लागली. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारLabourकामगार