शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे हित मी अण्णांपेक्षा अधिक चांगले जाणतो ग्रामविकास मंत्र्याची दर्पोक्ती

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या भू-संपादन कायद्याच्या वटहुकूमाविरुद्ध येत्या २३ व २४ फेबु्रवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत धरणे आंदोलन पुकारले असतानाच, शेतकऱ्यांचे हित मी अण्णांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे जाणतो, अशी दर्पोक्ती केंद्रीय ग्रामविकास मंत्री बिरेन्द्र सिंग यांनी गुरुवारी केली़

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या भू-संपादन कायद्याच्या वटहुकूमाविरुद्ध येत्या २३ व २४ फेबु्रवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत धरणे आंदोलन पुकारले असतानाच, शेतकऱ्यांचे हित मी अण्णांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे जाणतो, अशी दर्पोक्ती केंद्रीय ग्रामविकास मंत्री बिरेन्द्र सिंग यांनी गुरुवारी केली़
सरकारने शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध कुठलाही निर्णय घेतलेला नाही़ भूसंपादन वटहुकूम शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला जात असेल तर तो खोटा आहे़ हे निव्वळ प्रचारतंत्र आहे, असेही ते म्हणाले़
प्रस्तावित भू-संपादन विधेयकाविरुद्ध अण्णांनी येत्या २३ फेबु्रवारीला दिल्लीत दोन दिवसांचे आंदोलन पुकारले आहे़ या पार्श्वभूमीवर बिरेन्द्र सिंग यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी अण्णांच्या या प्रस्तावित आंदोलनाबाबत आपल्याला काहीही ठाऊक नसल्याचा दावा केला़ कोण धरणे आंदोलन करणार आहे आणि कोण नाही, मला माहीत नाही़ मी फक्त एवढेच म्हणेल की, शेतकऱ्यांचे हित, त्यांच्या गरजा याबाबत मी चांगले जाणतो़ कदाचित अण्णा जाणत नसतील एवढ्या चांगल्याप्रकारे जाणतो, असे ते म्हणाले़
प्रस्तावित भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहे असे आपल्याला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, प्रस्तावित भूसंपादन कायद्यात मुख्य तरतुदी जैसे थे असल्याचा दावा त्यांनी केला़
चौपट नुकसानभरपाई, पुनर्वसनाबाबतच्या भू संपादन कायद्यातील मुख्य तरतुदींमध्ये आम्ही कुठलाही फेरफार केलेला नाही़ या तरतुदी जैसे थे आहेत़ यात बदल केल्याचा आरोप निव्वळ प्रचारतंत्र आहे, असे ते म्हणाले़
औद्योगिक पट्टा, खासगी सार्वजनिक भागीदारीतील प्रकल्प, ग्रामीण पायाभूत विकास आणि परवडणाऱ्या घरांसह संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पांना जमीन संपादित करण्यासाठी संमती प्रक्रिया शिथिल करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांठी मोदी सरकारने भूसंपादन वटहुकूम आणला होता़ गत २९ डिसेंबरला केंद्र्रीय मंत्रिमडळाने या वटहुकूमास मंजुरी दिली होती़