शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: March 21, 2015 00:17 IST2015-03-20T22:39:39+5:302015-03-21T00:17:28+5:30

निफाड : नोव्हेंबर १४मध्ये झालेल्या बेमोसमी पावसाचा तडाखा परिसरात बसून फुलोर्‍यात असलेल्या बागांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामेही झाले मात्र शासनातर्फे अजूनही भरपाई मिळालेली नाही. पावसाळी वातावरणामुळे द्राक्षबागांचे चालू खुडे व्यापार्‍यांनी रोखले असून, द्राक्षाचे भाव आणखी खाली येण्याचे संकेत मिळत आहे.

Farmer waiting for compensation | शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

निफाड : नोव्हेंबर १४मध्ये झालेल्या बेमोसमी पावसाचा तडाखा परिसरात बसून फुलोर्‍यात असलेल्या बागांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामेही झाले मात्र शासनातर्फे अजूनही भरपाई मिळालेली नाही. पावसाळी वातावरणामुळे द्राक्षबागांचे चालू खुडे व्यापार्‍यांनी रोखले असून, द्राक्षाचे भाव आणखी खाली येण्याचे संकेत मिळत आहे.
या आपत्तीमुळे द्राक्षघडांना मोठमोठे तडे गेलेले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त द्राक्षबागा, रब्बीचे विविध पिकांचे पंचनामे करून वीजबिल, बँकेची वसुली त्वरित थांबवून विविध रब्बी पिकांची कर्जे माफ करावीत, अशी मागणी दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे-सुकेणे परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)
-----

Web Title: Farmer waiting for compensation