शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाईवरून फजिती

By admin | Updated: November 8, 2014 03:09 IST

निवडणूक आयोगाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या नुकसानभरपाईबाबत गृहमंत्रालयाला कडक शब्दांत समज दिली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या नुकसानभरपाईबाबत गृहमंत्रालयाला कडक शब्दांत समज दिली आहे.दंगलपीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचा दावा सरकारने केला आहे मग त्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे खंडन का केले नाही, असा सवालही आयोगाने केला आहे. गृह मंत्रालयाने अशा वृत्ताचा ठामपणे इन्कार करायला हवा होता. त्यामुळे शीखविरोधी दंगलीतील पीडितांना नुकसानभरपाई दिली जाणार असेच संकेत दिले गेले आहेत. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती भविष्यात केली जाऊ नये अशी ताकीदही आयोगाने दिली.केंद्र सरकारने १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत मारल्या गेलेल्या प्रत्येकाच्या वारसादाराला पाच लाख रुपये नव्याने भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ३१ आॅक्टोबर रोजी गृहमंत्रालयाला नोटीस जारी करून त्याबाबत उत्तर मागितले. दिल्लीतील विधानसभा पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्यामुळे आयोगाने गृहमंत्रालयाला ३ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. दिल्ली विधानसभा विसर्जित करण्यात आल्यामुळे आता ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे.प्रभाव पाडणारा निर्णय....२५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील कृष्णानगर, महरौली व तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपतींनी दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याने पोटनिवडणूक रद्द करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलींतील पीडित ३३२५ कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या दंगलीतील पीडितांपैकी २७३३ जणांचा मृत्यू दिल्लीत झाला. ३ नोव्हेंबर रोजी गृहमंत्रालयाने नुकसानभरपाईचा निर्णय घेतला नसल्याचा खुलासा केला. (विशेष प्रतिनिधी)