शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरमध्ये IAS बनून फिरणाऱ्या महिलेच्या अफगाणी बॉयफ्रेंडला अटक; कल्पनाच्या मोबाईलमध्ये सापडले पाकिस्तानचे ११ नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:51 IST

आयएएस अधिकारी भासवणाऱ्या महिलेच्या बॉयफ्रेंडला तपास यंत्रणांनी अटक केली आहे.

Delhi Blast: नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत असताना, या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःला आयएएस अधिकारी भासवणाऱ्या कल्पना भागवत नावाच्या संशयित महिलेच्या अटकेनंतर, आता तपास यंत्रणांनी तिच्या कथित अफगाणिस्तानी बॉयफ्रेंडलाही दिल्लीतून अटक केली आहे. मोहम्मद अशरफ नावाच्या या आरोपीच्या अटकेमुळे दहशतवादी हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक बाजू उघड होण्याची शक्यता आहे.

अफगाणी व्यापारी निघाला संशयित दहशतवादी

छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे आयएएस अधिकारी म्हणून राहत असलेल्या कल्पना भागवतला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. तिच्या चौकशीतूनच दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद अशरफ याचे नाव समोर आले. आरोपी मोहम्मद अशरफ याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. अशरफ हा अफगाणिस्तानचा नागरिक असून तो भारतात व्यापारी म्हणून राहत होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

तपास यंत्रणांना शंका आहे की, त्याचे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यवहार संशयास्पद असू शकतात. त्याच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील फंडिंग ट्रेल आणि परदेशातील मदतीचा स्रोत उघड होण्याची दाट शक्यता आहे.

कल्पनाच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानचे ११ नंबर

या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या कल्पना भागवत हिची कसून चौकशी गुप्तचर यंत्रणा करत आहे. तिच्या मोबाईल फोनच्या तपासणीत अत्यंत गंभीर माहिती समोर आली आहे. कल्पनाच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानशी जोडलेले ११ संशयास्पद फोन नंबर सापडले आहेत. प्राथमिक तपासानुसार, ज्या दिवशी (१० नोव्हेंबर) दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला, त्याच दरम्यान कल्पना भागवत दिल्लीत उपस्थित होती. तिच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

तपास आता आंतरराष्ट्रीय संकटाकडे

दिल्ली बॉम्बस्फोटात १० हून अधिक निष्पाप नागरिक ठार झाले होते आणि अनेकजण जखमी झाले होते. सुरुवातीला स्थानिक वाटणाऱ्या या हल्ल्याचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जोडले जात आहेत. सूत्रांनुसार, या हल्ल्यात बांग्लादेशातील अंसरुल्ला बांगला टीम आणि पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा  यांसारख्या संघटनांचे कनेक्शन उघड झाले आहेत.

मोहम्मद अशरफच्या अटकेनंतर आता तपास यंत्रणा कल्पना भागवत आणि अशरफ यांच्यातील आर्थिक व्यवहार, त्यांच्यातील संपर्क आणि विशेषतः त्यांच्या विदेशी संपर्कांची अत्यंत कसून चौकशी करणार आहेत. बनावट ओळखपत्र वापरणारी एक महिला आणि अफगाणी नागरिक असलेला तिचा कथित बॉयफ्रेंड यांचे पाकिस्तानशी थेट कनेक्शन सापडणे, हे भारतासाठी एका मोठ्या 'व्हाईट कॉलर टेरर' नेटवर्कचे संकेत देत असून, आगामी काळात या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake IAS Officer's Afghan Boyfriend Arrested; Pakistan Numbers Found

Web Summary : Delhi blast investigation reveals a fake IAS officer, Kalpana Bhagwat, and her Afghan boyfriend, Ashraf, arrested. Ashraf's financial dealings and Bhagwat's Pakistan connections are under scrutiny, suggesting a terror network.
टॅग्स :delhiदिल्लीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBlastस्फोट