शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोट, उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांत १८०० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:10 IST

उत्तराखंडमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या ७ मे रोजी नऊ हजार ६४२ इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २.२९ लाख झाली.  कुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान आटोपताच उत्तराखंड सरकारने निर्बंधदेखील घातले आहेत.

डेहराडून (उत्तराखंड) : उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तो प्रतीकात्मक ठेवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली सूचना मान्य झाली, तरीही एप्रिल महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येला प्रशासनाला आवर घालता आलेला नाही. ही वाढ तब्बल १८०० टक्के वाढली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात कुंभमेळा कोरोनामुळे फक्त महिनाभरच ठेवण्यात आला होता. गेल्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तसेच मृत्यूही. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यातील जवळपास निम्मे मृत्यू हे प्रतीकात्मक कुंभमेळा केला गेल्यानंतरचे. कुंभमेळ्यामुळेच राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले का, अशी चर्चा सुरू आहे.१ एप्रिल ते ७ मे यादरम्यान राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढले. या ३७ दिवसांत रुग्णसंख्या एक लाख ३० हजारांनी वाढली. ही संख्यादेखील राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी आहे. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १,७१३ मृत्यू हे १ एप्रिल ते ७ मेदरम्यानचे आहेत.  या आठ दिवसांत राज्यात ८०६ मृत्यू झाले. फक्त एप्रिल महिन्यात उत्तराखंडमध्ये रुग्णसंख्या तब्बल १८०० टक्क्यांनी वाढली आहे.

रुग्णसंख्या २.२९ लाखउत्तराखंडमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या ७ मे रोजी नऊ हजार ६४२ इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २.२९ लाख झाली.  कुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान आटोपताच उत्तराखंड सरकारने निर्बंधदेखील घातले आहेत.

दुसरी लाट कोणामुळे?- इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित सिंह यांनी सांगितले की, ‘जानेवारीमध्ये आपण सगळ्यांनी आपले संरक्षण दूर करून गर्दी करणे, धार्मिक कार्यक्रम आखणे, लग्नसमारंभ करायला सुरुवात केली. - या गोष्टी टाळायला हव्या होत्या. कोरोना भारतीय प्रकाराचा प्रसार आधीच सुरू झाला आहे हे आपल्याला माहिती असतानाही वरील गोष्टी केल्या. उत्तराखंडमध्येदेखील हेच झाले.” 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKumbh Melaकुंभ मेळा