शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील भाजपचा प्रत्येक सहावा खासदार ‘व्होटचोरी’द्वारे जिंकला : राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:25 IST

लोकसभेतील भाजपच्या २४० खासदारांपैकी, साधारणपणे प्रत्येक सहाव्या खासदाराने व्होटचोरी करूनच जागा मिळवली आहे, असे त्यांनी एक्सवरील  पोस्टमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेतील भाजपच्या प्रत्येक सहाव्या खासदाराने व्होटचोरी करून विजय मिळवला आहे. तसेच, खुद्द भाजपच्याच भाषेत त्यांना घुसखोर असे संबोधले जावे का, असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी उपस्थित केला. जर निष्पक्ष निवडणुका झाल्या, तर भाजपला आज लोकसभेत १४० जागाही जिंकता येणार नाहीत. मतचोरीच्या माध्यमातून, कधी एखादी वैयक्तिक जागा चोरली जाते, तर कधी संपूर्ण सरकारच चोरले जाते. लोकसभेतील भाजपच्या २४० खासदारांपैकी, साधारणपणे प्रत्येक सहाव्या खासदाराने व्होटचोरी करूनच जागा मिळवली आहे, असे त्यांनी एक्सवरील  पोस्टमध्ये म्हटले आहे.

परदेशी कोट्यातून डल्ला! रेल्वेचा १२१ प्रवाशांना मोठा दंड; पाहा कसा होत होता तिकिटांचा गैरवापर

त्यांना ओळखणे कठीण नाही. खुद्द भाजपच्याच भाषेत सांगायचे तर, आपण त्यांना ‘घुसखोर’ असे संबोधले पाहिजे का? आणि हरयाणाचे काय? तिथे तर संपूर्ण सरकारच एक ‘घुसखोर’ आहे. ज्या संस्थांना ते आपल्या खिशात घालून फिरतात- ज्यांचा वापर करून ते मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेत फेरफार करतात- त्या संस्थाच मुळात ‘रिमोट-कंट्रोल्ड’ आहेत. त्यांची खरी भीती म्हणजे ‘सत्य’. कारण जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या, तर त्यांना आज १४० जागाही जिंकता आल्या नसत्या, असे ते म्हणाले. त्यांनी तृणमूलच्या समर्थनासाठीही भूमिका घेतली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपसमोर तृणमूलचा मोठा पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आपले क्षुद्र राजकारण बाजूला ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा

काँग्रेसमधील काही जण तसेच इतर काही जण तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करत आहेत. त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे की, आसाम आणि बंगालचा जनादेश चोरणे, हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे.

क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा. हा मुद्दा एखाद्या विशिष्ट पक्षाचा नाही. हा मुद्दा भारताचा आहे, असे त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's one in six MPs won by vote theft: Rahul Gandhi

Web Summary : Rahul Gandhi alleges one in six BJP MPs won via 'vote theft.' He questioned if they should be called 'infiltrators.' He claims BJP wouldn't win 140 seats in fair elections and urged support for Trinamool, condemning celebrating their defeat.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस