शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन थंडीतही जानेवारी ठरला सर्वांत उष्ण महिना, 1940 नंतर सर्वाधिक तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:09 IST

Global Warming News: २०२४ हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले आहे. अशातच २०२५ मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली: 'ला निना'चा प्रभाव असूनही, जानेवारी महिन्यात १९४० नंतरचे सर्वाधिक विक्रमी तापमान नोंदविले गेले. युरोपियन हवामान संस्थेने गुरुवारी ही माहिती दिली. 'ला निना'मुळे जागतिक तापमान कमी होते.

२०२४ हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले आहे. अशातच २०२५ मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जागतिक सरासरी तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे.

'सी३एस'नुसार...

कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (सी३एस) नुसार, जानेवारी २०२५ मध्ये सरासरी १३.२३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे मागील सर्वांत उष्ण जानेवारी (२०२४) पेक्षा ०.०९ अंश जास्त आणि १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा ०.७९ अंश जास्त होते.

'ला निना'चा प्रभाव काय?

१ 'ला निना' ही एक हवामान पद्धत आहे जिथे मध्य प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील पाणी नेहमीपेक्षा थंड होते, ज्यामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.

ला निनाच्या प्रभावामुळे भारतात 3 जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो आणि त्याचबरोबर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दुष्काळी स्थिती निर्माण होते. यामुळे जागतिक तापमान थोडे थंड होते, किंवा तापमान कमी होते. तर या उलट, 'एल निनो'ची घटना हवामान गरम करते, असे संशोधकांनी सांगितले.

जागतिक तापमान १.५ अंशांपेक्षा जास्त

शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की जानेवारीमध्ये पृथ्वीचे तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा १.७५ अंश सेल्सिअस जास्त होते. गेल्या १९ महिन्यांपैकी १८ महिन्यांत जागतिक तापमान १.५ अंशांपेक्षा जास्त राहिले. गेल्या १२ महिन्यांचा कालावधी (फेब्रुवारी २०२४ - जानेवारी २०२५) औद्योगिकीकरणापूर्वीच्या काळापेक्षा १.६१ अंश सेल्सिअस जास्त उष्ण होता. जानेवारीत समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान २०.७८ अंश से. होते.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानdelhiदिल्ली