शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

भाजपचेही ५०० रुपयांत सिलिंडर; निवडणुकांसाठी मोदींची गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 5:56 AM

मतदारांना घडविणार रामलल्लाचे दर्शन; अमित शाह यांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध

रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजपने शेतकऱ्यांकडून ३१०० रुपये प्रतिक्विंटल दराने धान खरेदी, महिलांना वर्षाला १२ हजार रुपये, पाचशे रुपयांना एलपीजी सिलिंडर तर दोन वर्षांत एक लाख तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २० हमी असलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला. गरिबांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येईल, असे आश्वासनही भाजपने छत्तीसगडच्या मतदारांना दिले आहे.

‘मोदीज गॅरंटी २०२३ फॉर छत्तीसगड’ nजाहीरनाम्याला ‘मोदीज गॅरंटी २०२३ फॉर छत्तीसगड’ असे नाव देण्यात आले आहे. n ‘कृषक उन्नती योजना’ सुरू करण्यात येईल. त्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिएकर २१ क्विंटल धानाची ३१०० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी हाेईल. ‘महातारी वंदन योजने’अंतर्गत विवाहित महिलांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळतील.nप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १८ लाख घरे बांधली जातील. राज्यातील प्रत्येक घरात स्वच्छ नळाचे पाणी पुरवठा केला जाईल. nभूमिहीन शेतमजुरांना वार्षिक १०,००० रुपये दिले जातील. केंद्राच्या ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत ५ लाख रुपयांसह, प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाख रुपये असे एकूण १० लाख रुपये दिले जातील.

विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक प्रवास भत्ता देण्याची तसेच एम्सच्या धर्तीवर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि प्रत्येक विभागात आयआयटीच्या धर्तीवर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निर्माण करण्यात येईल. 

राज्यात शक्तिपीठ योजना लागू करण्यात येणार असून छत्तीसगडमधील गरीब जनतेला रामलल्ला दर्शन घडविण्यासाठी ‘रामलल्ला दर्शन योजना’ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक