शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

पराभवानंतरही राहुल गांधी गुजरात-हिमाचलच्या दौ-यावर जाणार, सोमनाथ मंदिराचे घेणार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 5:26 PM

पराभवानंतरही या आठवड्यातच राहुल गांधी गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून भाजपाला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे राहुल गांधी दोन्ही राज्यातील जनतेला आणि मित्र पक्षांना धन्यवाद देणार आहेत. याचबरोबर, राहुल गांधी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपराभवानंतरही राहुल गांधी गुजरात-हिमाचलच्या दौ-यावर जाणारसोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणार अहमदाबादमध्ये कॉंग्रेसची चिंतन बैठक

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तर या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले. नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष  राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी 92 जागांची गरज होती. दरम्यान, पराभवानंतरही या आठवड्यातच राहुल गांधी गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून भाजपाला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे राहुल गांधी दोन्ही राज्यातील जनतेला आणि मित्र पक्षांना धन्यवाद देणार आहेत. याचबरोबर, राहुल गांधी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे. सोमनाथमध्ये कॉंग्रेसने चार जागांवर विजय मिळविला आहे. तसेच, बुधवारपासून अहमदाबादमध्ये कॉंग्रेसची चिंतन बैठक आहे. या बैठकीत एक दिवसांसाठी राहुल गांधी हजर राहणार आहेत. ही चिंतन बैठक 20, 21 आणि 22 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाना साधला. ते म्हणाले की, गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काँग्रेससाठी हा चांगला निकाल नसून गुजरातमध्ये भाजपाला जबरदस्त फटका बसला असल्याचा टोलाही राहुल गांधींनी लगावला. यावेळी त्यांनी विजयी झालेल्यांचे अभिनंदनही केले.'आमच्यासाठी हा खूप चांगला निकाल आहे. ठीक आहे पराभव झाला, जिंकू शकत होतो. तिथे थोडी कमतरता राहिली', असे राहुल गांधी म्हणाले. 'तीन चार महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही गुजरातमध्ये गेलो तेव्हा काँग्रेस भाजपासोबत लढू शकत नाही असा दावा करण्यात आला होता. पण आम्ही मेहनत केली आणि निकाल तुमच्या समोर आहे. भाजपाला जबरदस्त फटका बसला आहे', असे राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017