शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 07:47 IST

राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा; मुकेश खुल्लर समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला, ठरावीक संवर्गांना होणार लाभ, काही संवर्गातील अधिकारी-कर्मचारी अजूनही वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभागांमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे. त्यामुळे अन्याय झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी सुधारित वेतनश्रेणी दि. १ जून २०२५ पासून दिली जाईल व त्याची थकबाकी दिली जाणार नाही, असे वित्त विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले. सातव्या आयोगात काही संवर्गावर अन्याय झाल्याची निवेदने संघटनांनी दिली होती. त्यावर १६ मार्च २०२४ रोजी निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

सरकारच्या आदेशात नेमके काय म्हटले आहे?

खुल्लर समितीच्या शिफारशींनुसार वेतननिश्चिती (पे फिक्सेशन) ही ज्या दिवशीपासून सातवा वेतन आयोग लागू झालेला होता त्या दिवसापासून (१ जानेवारी २०१६) लागू होणार आहे. मात्र, त्याचा प्रत्यक्ष लाभ हा १ जून २०२५ पासून लागू केला जाणार आहे.या काळात जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना ही थकबाकी दिली जाणार नाही, पण १ जून २०२५ पासून सुधारित सेवानिवृत्तीवेतन लागू होणार आहे. या आधीच्या काळातही त्या-त्या वेळच्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करताना थकबाकी न देण्याची भूमिका राज्य सरकारांनी घेतलेली होती.

कुणाकुणाला लाभ ?

कृषी, शालेय शिक्षण व क्रीडा, गृह, उद्योग, ऊर्जा, कामगार, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास, पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, सहकार, पणन, वस्रोद्योग, वित्त, माहिती व जनसंपर्क, अन्न व नागरी पुरवठा, महसूल, उच्च व तंत्रशिक्षण, कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठे, मराठी भाषा, वन, कौशल्य विकास, आदिवासी विकास, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता, विधानमंडळ सचिवालय आदी विभागांतील ठरावीक संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

राजपत्रित अधिकारी संघटनेकडून स्वागत, पण...

राजपत्रित अधिकारी संघटनेचे नेते समीर भटकर यांनी 'लोकमत'ला सांगितले की, आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. विविध संघटनांकडून सरकारी विभागांनी या वेतन त्रुटींबाबतची निवेदने मागविली होती आणि ती पुढे खुल्लर समितीकडे दिली. मात्र, काही विभाग असे होते की संघटनांनी केलेल्या मागण्या अवास्तव असल्याचे कारण देत त्यांनी ही निवेदने खुल्लर समितीकडे पाठविलीच नाहीत. त्यामुळे काही संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांवरचा अन्याय अजून कायम आहे, तो सरकारने दूर करावा.

कालबाह्य पदे रिक्त करा, खुल्लर समितीची राज्य सरकारला शिफारस

राज्य सरकारी सेवेतील काही कालबाह्य संवर्ग / पदे रद्द करून काही पदे विविध उपयोगी (मल्टिटास्किंग) करण्यात यावीत अशी शिफारस मुकेश खुल्लर समितीने केली आहे. सध्याचे संवर्ग ४० वर्षापूर्वीचे होते. मात्र आता अनेक संवर्गाची आवश्यकता राहिली नसेल किंवा काही नव्याने निर्माण झाले असतील. काही नवीन प्रशासकीय विभागही तयार झाले. म्हणून नवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सर्व संवर्गाचे योग्य मूल्यमापन आवश्यक आहे. सरकारने एक समिती नेमून निर्णय घ्यावा, असे खुल्लर समितीने म्हटले आहे. तसेच सेवाप्रवेशाच्या नियमांमध्येही सुधारणा करावी असे म्हटले आहे. सर्वच प्रशासकीय विभागांनी त्यांचे आकृतिबंध कालानुरूप सुधारित करण्याची आवश्यकता आहे. एका संवर्गाला एकाचप्रकारची जबाबदारी न देता विविध उपयोगी (मल्टिटास्किंग) जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता समितीने अधोरेखित केली आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार