बिबट्याची शिकार प्रकरण

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30

आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Episode of leopard | बिबट्याची शिकार प्रकरण

बिबट्याची शिकार प्रकरण

ोपीचा जामीन अर्ज फेटाळला
बिबट्याची शिकार प्रकरण
नागपूर : बिबट्याच्या शिकारप्रकरणी पहिले तदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
शंकर मारोती गायकवाड (४०) असे आरोपीचे नाव असून, तो भिवापूरच्या घाट उमरी येथील रहिवासी आहे.
सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी, या गुन्ह्यातील फरार आरोपी श्रावण तानबा वाघमारे आणि प्रशांत यशवंत जांभुळकर यांनी बिबट्यांची शिकार करून दोन चामडे शंकर गायकवाड याच्या घरी ठेवले होते. त्यासाठी त्याला २० हजार रुपये मिळणार होते. दोन चामड्यांपैकी एक शंकरने १२ सप्टेंबर २०१४ रोजी श्रावण वाघमारे आणि रणजितसिंग जुनी यांना दिले होते. रणजितसिंग हा या चामड्याचा १५ लाखात सौदा करण्याच्या तयारीत असताना, त्याला वन विभागाच्या पथकाने चामड्यासह अटक केली होती.
शंकरने आपल्या घरातील दुसरे चामडे पकडल्या जाण्याच्या भीतीने भिवापूर येथीलच पुष्पा विश्वेकर हिच्या शेतात लपवून ठेवले होते. याशिवाय त्याचे फरार आरोपींसोबत संबंध होते, हे सीडीआर अहवालावरून स्पष्ट होते. या गुन्ह्यात शंकरचा थेट संबंध आहे, असे सरकार पक्षातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. शंकरला अटक झालेली आहे. तो कारागृहात आहे. त्याने जामीन अर्ज दाखल करून जामिनाची विनंती केली होती. प्रकरण गंभीर असल्याने त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्चना नायर यांनी काम पाहिले.

Web Title: Episode of leopard