शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

EPFO: मोदी सरकराने २४ कोटींहून अधिक जणांच्या खात्यात पाठवले पीएफच्या व्याजाचे पैसे, त्वरित तपासून घ्या तुमचा अकाउंट बॅलन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 21:51 IST

EPFO Account Balance : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) ने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २४.०७ कोटी व्यक्तींच्या खात्यामध्ये (Provident Fund ) ८.५० टक्के दराने व्याज जमा केले आहे.

नवी दिल्ली - कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) ने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी २४.०७ कोटी व्यक्तींच्या खात्यामध्ये ८.५० टक्के दराने व्याज जमा केले आहे. ईपीएफओने  अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितले की, आतापर्यंत २४.०७ कोटी लोकांच्या खात्यामध्ये २०२०-२१ या वर्षासाठी ८.५० टक्के दराने पैसे जमा करण्यात आले आहेत. तुमच्या खात्यामध्ये पीएफचे व्याज जमा झाले आहे की, नाही हे तुम्ही त्वरित या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

एसएमएसच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेण्यासाठी ईपीएफओचा रजिस्टर मोबाईल नंबर 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवून तुम्ही बॅलन्स जाणून घेऊ शकता. LAN चा अर्थ भाषा असा आहे. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असेल तर LAN च्या जागी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN लिहावे लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFO UAN HIN लिहून मेसेज लिहून पाठवावा लागेल.

तसेच तुम्ही एखा मिसकॉलच्या माध्यमातूनही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ०११ २२९०१४०६ वर मिसकॉल देऊन बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्याबरोबरच तुम्ही तुमचा बॅलन्स ऑनलाइन जाणून घेण्यासाठी ईपीएफ पासबूक पोर्टलवर भेट देऊ शकता. या पोर्टलवर तुम्ही तुमचा UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून ल़ॉगइन करा. त्यामध्ये Download/View Passbook वर क्लिक करा आणि नंतर तुमच्यासमोर पासबूक उघडेल, ज्यामध्ये तुम्ही अकाऊंट बॅलन्स पाहू शकता.

तसेच जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही या अॅपच्या माध्यमातून जेव्हा वाटेल तेव्हा ईपीएफ बॅलन्स पाहू शकता. त्यासाठी उमंग अॅप उघडून या अॅपमध्ये EPFO वर क्लिक करा. त्यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा. त्यानंतर View Passbook वर क्लिक करून  UAN आणि पासवर्ड टाका. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.  तो टाईप केल्यावर EPF बॅलन्स दिसेल. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीMONEYपैसाEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार