राजुरी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30

The enthusiasm of the Rajuri School | राजुरी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

राजुरी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

>राजुरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ४ मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन माजी सभापती दीपक औटी व या विभागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहल शेळके व गावचे सरपंच बाळासाहेब हाडवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अश्पाक चौगुले, बबन गटकळ गुरुजी, राजेंद्र हाडवळे, विशाल हाडवळे, विक्रम डुंबरे, डी. बी. गटकळ, कैलास शेटे, दीपक हाडवळे, लक्ष्मण फावडे, सुनीता रायकर, मीना आवटे, धंगाळे गुरुजी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना लग्नसोहळा, कोळीनृत्य, गौळणी, हिंदी नृत्य, भक्तिगीते, बालगीते, वृद्ध माता-पित्यांची काळजी घ्या, असे कार्यक्रम झाले.
पारंपरिक पोवाड्याने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच शाळेला गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळाला असून शाळेचे ३ विद्यार्थी तालुक्यात प्रथम आले असून सतत ३ वर्षे प्रथम क्रमांकात नंबर आले आहे. यामध्ये गौरव हाडवळे, प्रतीक्षा डुंबरे यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी स्कॉलरशिपचे विद्यार्थी श्रुतिका पवार, सुजल सहाणे, अनिकेत पानसरे या विद्यार्थ्यांचा; तसेच वर्षा गोपाळे, संगीता कुदळे, कल्पना कणसे, वैशाली शिंदे व गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले नानाभाऊ कणसे या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. देशमुख सरांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक अशोक भोर यांनी आभार मानले.
फोटो ओळी : राजुरी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ४ मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना शालेय विद्यार्थी.

Web Title: The enthusiasm of the Rajuri School