शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक विभागाची साडे चार कोटींची वसुली ९ कोटींचे उद्दिष्ट्य : केबल व चित्रपटगृहांचे सर्वाधिक उत्पन्न

By admin | Updated: December 29, 2015 23:52 IST

जळगाव : जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चिपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ४ कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. यात केबल जोडणी व चित्रपटगृहांच्या माध्यमातून मिळणारा कर हा सर्वाधिक आहे.

जळगाव : जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चिपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ४ कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. यात केबल जोडणी व चित्रपटगृहांच्या माध्यमातून मिळणारा कर हा सर्वाधिक आहे.

जिल्हा प्रशासनाने जमिन, गौण खनिज तसेच करमणूक कराच्या स्वरुपात कराची वसुली केली जात असते. गौण खजिन व महसूल करापाठोपाठ करमणुकीवर आकारल्या जाणार्‍या कराची रक्कम ही मोठी असते. या विभागाने नऊ महिन्यात करमणूक करापोटी चार कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. त्यात केबल जोडणीच्या माध्यमातून एक कोटी ४० लाख ३ हजार ७९६ रुपये, चित्रपटगृहांच्या माध्यमातून एक कोटी ३३ लाख ७८ हजार ५५१ रुपये, डी.टी.एच.च्या माध्यमातून एक कोटी ९४ लाख ५८ हजार ९३६ रुपयांचा कर वसुल करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ व्हीडीओ केंद्रांकडून २८ हजार ९२९ रुपये, मनोरंजन उद्यानांकडून १२ हजार ८९७ रुपये, व्हीडीओ गेमच्या माध्यमातून ७० हजार ५५५ तर अन्य मनोरंजन केंद्रांकडून ७७ हजार ९२६ रुपयांच्या कराची वसुली करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने करमणूक कर विभागाला २०१५/१६ या वर्षभरासाठी ९ कोटी रुपयांच्या कराच्या वसुलीच उद्दिष्ट्य दिले आहे. ९ महिन्यात या विभागाने चार कोटी ४१ लाखांपर्यंत मजल मारली आहे. आता अवघ्या तीन महिन्यात साडे चार कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान कायम राहणार आहे. ३१ डिसेंबर रोजी होणार्‍या विविध मनोरंजन कार्यक्रमाच्या आयोजनामुळे कराच्या रकमेत भर पडणार आहे.

इन्फो-
डिजिटायझेशनच्या सक्तीमुळे वाढणार उत्पन्न
जिल्ह्यातील नागरी वस्तीमधील केबल टी.व्ही.च्या डिजिटायझेशन साठी जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या अंतर्गत प्रत्येक जोडणीधारकाला सेट टॉप बॉक्स बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ११ डिसेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार फेज १ मध्ये डिजिटायझेशन करण्यात आलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त उर्वरित नागरी भागात डिसेंबर २०१५ पर्यंत तसेच ग्रामीण भागात डिसेंबर २०१६ पर्यंत केबलचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात येणार आहे.