शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक कधी? विधानसभेच्या जागा वाढणार? जाणून घ्या मोदी सरकारचं 'मिशन काश्मीर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:55 IST

पंतप्रधान मोदींची काल जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा; विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू

नवी दिल्ली/श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल भेट घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मोदींनी प्रथमच तिथल्या नेत्यांची भेट घेऊन संवाद साधला. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेऊन तेथील राजकीय स्थिती पूर्ववत करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होणार; ३ तासांच्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षीच्या डिसेंबर ते पुढील वर्षाच्या मार्च महिन्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होऊ शकते. याच कालावधीत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि इतर काही राज्यांत निवडणूक होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील काही मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचं काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीची प्रक्रिया हाती घेईल.संपूर्ण राज्याच्या मुद्द्यावर शाहंचं मोठं विधान, J&Kच्या परिसीमन आणि निवडणुकीसाठी सरकार वचनबद्ध

जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं का वेगानं सुरू आहे. तिथे लवकर निवडणूक घेण्यासाठी त्या कामाला गती देण्यात येत आहे. तिथे लोकनियुक्त सरकार यायला हवं आणि प्रदेशाचा विकास व्हायला हवा, असं पंतप्रधान मोदी काल झालेल्या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांना म्हणाले. या बैठकीला १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. साडे तीन तास ही बैठक चालली. 

जम्मू-काश्मीरला पुन्हा मिळणार राज्याचा दर्जा? कितीनं वाढणार विधानसभेच्या जागा?मोदी सरकारनं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये घेतला. त्यामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा संपुष्टात आला. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. यानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांची रचना बदलण्याचं काम सुरू करण्यात आलं. जम्मू-काश्मीर विधानसभेतील मतदारसंघांची संख्या ८३ वरून ९० वर नेली जाऊ शकते. विधानसभेच्या २४ जागा पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात. त्यामुळे त्या रिक्त असतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर