शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या अधिकाऱ्याला हेराल्ड प्रकरण भोवले

By admin | Updated: December 16, 2015 03:52 IST

नॅशनल हेराल्डप्रकरणी क्लोझर रिपोर्टची (फाईलबंद) शिफारस करणारे अंमलबजावणी संचालनालयातील अधिकारी (ईडी) हिमांशू कुमार लाल यांची या संस्थेतून उचलबांगडी करण्यात

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी क्लोझर रिपोर्टची (फाईलबंद) शिफारस करणारे अंमलबजावणी संचालनालयातील अधिकारी (ईडी) हिमांशू कुमार लाल यांची या संस्थेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. लाल यांची विशिष्ट ओळख क्रमांक प्राधिकरणात (युआयडीएआय) उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश तडकाफडकी धडकला.युआयडीएआय हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारित येते. पुढील वर्षी २६ डिसेंबरपर्यंत म्हणजे कार्यकाळ संपेपर्यंत लाल यांची या पदी नियुक्ती राहील. लाल हे ओडिशा कॅडर २००३ चे अधिकारी असून ते यापूर्वी ईडीमध्ये संयुक्त संचालक होते. महसूल विभागाला पाठविलेल्या अहवालात त्यांनी हेराल्ड प्रकरण फाईलबंद करण्याची शिफारस केली होती. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड खरेदीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने समन्स पाठविल्यामुळे प्रकरण तापले आहे. संसदेतही या मुद्यावर कामकाज बंद पडले होते. काँग्रेसच्या या दोन नेत्यांविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) एफआयआर नोंदविण्याजोगे कोणतेही पुरावे नाहीत. सकृतदर्शनी तसा गुन्हा दिसत नाही, असे लाल यांनी अहवालात म्हटले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत तक्रार केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)