शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पसार

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

नागपूर : मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पळून गेला. गुरुवारी पहाटे रामदासपेठेत ही घटना घडली. सुप्रीम रामभाऊ जुनघरे (वय २४) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. तो बोरगाव, सौंसर (छिंदवाडा) येथील रहिवासी आहे.

नागपूर : मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पळून गेला. गुरुवारी पहाटे रामदासपेठेत ही घटना घडली. सुप्रीम रामभाऊ जुनघरे (वय २४) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. तो बोरगाव, सौंसर (छिंदवाडा) येथील रहिवासी आहे.
रामदासपेठेतील आर्किटेक्ट महावीर जैन यांच्याकडे कारचालक म्हणून जुनघरे काम करीत होता. भद्रावती येथील सुप्रसिध्द जैन मंदिरात बुधवारी धार्मिक कार्यक्रम होता. त्यामुळे जैन आपल्या मित्रांसोबत तेथे गेले होते. त्यांना भद्रावतीला सोडून आरोपी जुनघरे कार घेऊन नागपुरात परतला. जैन यांच्या निवासस्थानी पार्किंगमध्ये कार ठेवून त्याने जैन यांच्या परिवारातील सदस्यांना कारची चावी दिली. रात्री तो पार्किंगमधील रेस्टरूममध्ये झोपला. सकाळी ५ वाजता त्याने चौकीदाराला मालकांनी बोलविल्याचे सांगून प्रवेशद्वार उघडण्यास बाध्य केले. बनावट चावीने कार सुरू करून जुनघरे पळून गेला.
उशिरा रात्री धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर जैन यांनी जुनघरेला कार घेऊन बोलविण्यासाठी संपर्क केला. त्याचा मोबाईल सारखा बंद असल्याचे पाहून ते नागपूरकडे निघाले. सकाळी ९ वाजता ते येथे पोहचले. त्यांना आपली वर्ना कार (एमएच ३१/ डीव्ही ०६३०) दिसली नाही. त्यांनी विचारपूस केली असता जुनघरे सकाळी ५ वाजता कार घेऊन गेल्याचे अपार्टमेंटच्या चौकीदाराने सांगितले. त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे जैन यांनी त्याच्या छिंदवाडा येथील नातेवाईकांकडे संपर्क साधला. जुनघरे वाईट वृत्तीचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे जैन यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
--
बॉक्स
शहानिशा करूनच ठेवले कामावर
जुनघरे दीड वर्षांपासून ट्रान्सपोर्टर परेश वेद यांच्याकडे काम करायचा. काही दिवसांपूर्वीच तो महावीर जैन यांच्याकडे कामाला आला. आवश्यक ती सर्व कागदपत्रे जवळ ठेवून, शहानिशा करूनच जैन यांनी जुनघरेला कामावर ठेवले. तरीसुद्धा त्याने धोकेबाजी केली. त्याने अशाचप्रकारे यापूर्वीही गुन्हे केले असावे, असा संशय आहे. सीताबर्डी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---