शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात यंत्रणा सक्रिय

By admin | Updated: September 22, 2014 09:47 IST

शनिवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून वसई व नालासोपारा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही

वसई : शनिवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून वसई व नालासोपारा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पोलीस व निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली.पालघर जिल्ह्यात वसई व नालासोपारा हे दोन मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी आहेत. उर्वरीत पालघर, विक्रमगड, डहाणू व बोईसर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कालपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पण एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत २७ सप्टें. पर्यंत असून त्या दिवशी मात्र सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरीही निवडणूक यंत्रणा व पोलीसांनी कालपासूनच आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. अनेक चौकात तपासणीनाके उभारण्यात आले असून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने या दोन्ही मतदारसंघातील सुमारे ८०० होर्डींग्ज व बॅनर्स उतरवले आहेत. निवडणुक यंत्रणेने मोक्याच्या ठिकाणी कॅमेरामनना तैनात केले आहेत. ही निवडणुक सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी निवडणुक यंत्रणा विविध स्तरावर उपाययोजना करीत आहे. या दोन्ही मतदारसंघातील अनेक भाग संवेदनशील असल्यामुळे निवडणूक व पोलीस यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.