शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : रशियाचा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजशी करार; इंडियन इम्युनॉलॉजिकल्सशीही चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:23 IST

स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे संयुक्तपणे पार पाडणार आहेत.

नवी दिल्ली : रशियाने बनविलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या पार पाडण्यासाठी, तसेच लसीचे १० कोटी डोस पुरविण्याबाबत त्या देशाने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या भारतीय कंपनीशी करार केला आहे, तसेच या लसीचे उत्पादन करण्यासाठी रशियाने इंडियन इम्युनॉलॉजिकल्स लिमिटेड या दुसऱ्या भारतीय कंपनीशीही चर्चा सुरू केली असून, तिच्याशीही करार होण्याची शक्यता आहे.स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे संयुक्तपणे पार पाडणार आहेत. स्पुटनिक व्ही या लसीच्या ३० कोटी डोसचे उत्पादन करण्यासाठी रशियाने भारताशी याआधीच करार केला आहे. आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दमित्रिव यांनी सांगितले की, स्पुटनिक व्हीच्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस लवकरात लवकर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये उपलब्ध होईल. या लसीच्या उत्पादनासाठी आरडीआयएफ आणखी चार भारतीय कंपन्यांशी चर्चा करीत आहे. त्यामध्ये इंडियन इम्युनॉलॉजिकल्स या कंपनीचाही समावेश असून, ती हैदराबादची कंपनी आहे.दमित्रिव म्हणाले की, स्पुटनिक व्ही लसीच्या मानवी चाचणीच्या पहिल्या व दुसºया टप्प्याचे प्रयोग यशस्वी झाले असून, तिसºया टप्प्यातील प्रयोग भारतात करण्यात येतील. भारतात स्पुटनिक- व्ही या लसीला मान्यता मिळाल्यानंतर उत्पादनाला सुरुवात करता येईल.चाचण्या पुन्हा सुरू करण्यास सिरमला परवानगीआॅक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनिसा विकसित करीत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्या पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला संमती दिली आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या एकाची तब्येत बिघडल्यामुळे त्या देशासह भारतात या चाचण्या काही दिवस थांबविण्यात आल्या होत्या. या लसीच्या मानवी चाचण्या भारतात सिरम इन्स्टिट्यूट पार पाडत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशिया