शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना दत्तक घेण्यासाठी दाम्पत्याची धडपड

By admin | Updated: February 22, 2017 10:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'उत्तर प्रदेशाचा दत्तक पुत्र' या विधानावरुन गोंधळ सुरू असताना गाजियाबादमधील नागरिकांनी मोदींना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमत

गाजियाबाद, दि. 22 - उत्तर प्रदेशातील बाराबांकी येथील जाहीर सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'उत्तर प्रदेशाचा दत्तक पुत्र' या विधानावरुन गोंधळ सुरू असताना गाजियाबादमधील नागरिकांनी मोदींना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली आहे. 
 
आश्चर्याची बाब म्हणजे येथील रहिवासी आणि पताला निवाडीतील माजी अध्यक्ष योगेंद्र पाल योग मंगळवारी पत्नीसोबत रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी दत्तक घेण्यासाठी अर्जदेखील दाखल केला.  यावेळी, दत्तक देणारा पक्ष उपस्थित नसताना दत्तक घेण्याची प्रक्रिया होणे शक्य नाही, असे तेथील अधिका-याने योग दाम्पत्याला सांगितले. 
(पंतप्रधान मोदींनी अमेरिकन सदस्यांच्या कानावर घातली भारताची नाराजी)
 
काय आहे नेमके प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी बाराबांकीमधील प्रचार सभेत जनतेला संबोधित करताना म्हटले होते की, जे विकास कार्य उत्तर प्रदेशाचा मुलगा (अखिलेश यादव) करुन शकला नाही, ते काम त्यांचा दत्तक पुत्र (पंतप्रधान नरेंद्र मोदी) करेल. यानंतर उत्तर प्रदेशआतील बाल अधिकार संरक्षण आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवली. या नोटीसद्वारे आयोगाने त्यांना विचारले की 'उत्तर प्रदेशात कुणी तुम्हाला दत्तक घेतले आहे?'. 
 
आयोगाच्या या नोटीसनंतर योगेंद्र पाल योगी यांनी घोषणा केली होती की, ते मोदींना दत्तक घेऊन त्यांचा दत्तक पुत्र म्हणून स्वीकार करतील.  त्यानुसार  त्यांनी पद्धतशीरपणे दत्तक घेण्यासाठीचा अर्ज तयार केला आणि मंगळवारी पत्नीसोबत त्याची नोंदणी करण्यासाठी सब-रजिस्ट्रारकडे अर्ज सादर केला. यावेळी त्यांनी अधिका-यांना निवेदन केले की,  'या अर्जाचे रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरुन संबंधित कागदपत्रं ते उत्तर प्रदेशातील बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे पाठवतील.' 
 
नियमांनी घातला खोडा
मात्र याप्रकरणात अधिका-याने सांगितले की, दत्तक प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन्ही पक्ष (दत्तक देणारे आणि दत्तक घेणारे) उपस्थित असणं गजरेचे असते. दोघांच्या उपस्थितीतच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. म्हणून त्यांनी योगी यांच्या अर्जावर आक्षेप घेत त्यांना माघारी पाठवले. अधिका-याने असेही स्पष्ट केले की, दत्तक तेच देऊ शकतात, जे संबंधित व्यक्तीचे आई किंवा वडील आहेत. त्यांना आई-वडील असण्याचा पुरावाही सादर करावा लागतो.