शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत बांगलादेशी गुन्हेगारांना अटक

By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST

घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर

घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर
..................
डोंबिवली - उसरघर येथे २७ ऑगस्ट रोजी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून, तो बांगलादेशी घुसखोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोसिलांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. हे सर्व मारेकरीही बांगलादेशी घुसखोर असल्याचे तपासात उघड झाल्याने शहरातील घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
मानपाडा परिसरातील उसरघर गावाच्या हद्दीत २७ ऑगस्ट रोजी एक मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या उजव्या दंडाला असलेल्या ताईतावरून आणि अन्य काही खुणांवरून तो बांगलादेशी असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानुसार बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य असलेल्या भागांत शोध घेण्यात आला आणि मोहन उर्फ सनातन बरमन (२८), बबलू चौरसीया (३२) आणि युनूस अकमल शेख (२९) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यातून या तिघांनी नुरजमाल हबीबुल मुल्ला (२६) याची हत्या केल्याचे उघड झाले.
आरोपी मोहन हा बारमध्ये तरुणी पुरविण्याचा धंदा करत असून त्याच्याकडे कामाला असलेल्या ब्युटी खातून उर्फ बिना अब्दुल कासम मडोल हिच्याशी नुरजमालने विवाह केला होता. त्यामुळे मोहनच्या धंद्यावर परिणाम झाला होता़ या रागातून त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने नुरजमालची हत्या केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी मोहनसह बबलू आणि युनूस या तिघांना अटक करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करून भारतात राहणार्‍या ब्युटी खातूनवरही कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)