शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘दांडीबाज’ आमदारांमुळे लोकसभेचा अभ्यासवर्ग ओस!

By admin | Published: March 03, 2015 12:51 AM

महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या आमदारांच्या ‘दांडीबाजीने’ लोकसभा सचिवालयापुढे आज महाराष्ट्राची पुरती कोंडी झाली!

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीमहाराष्ट्र विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या आमदारांच्या ‘दांडीबाजीने’ लोकसभा सचिवालयापुढे आज महाराष्ट्राची पुरती कोंडी झाली! अखेर, १२० पैकी अवघ्या २३ आमदारांच्या उपस्थितीत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लोकसभेच्या आवारात तीन दिवसांच्या अभ्यासवर्गाला सोमवारी प्रारंभ केला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहातील मोकळ््या जागांवर नजर टाकत दांडीबाजांना टोले जरी हाणले नाहीत, तरी समाजाने लोकप्रतिनिधीसारखी उपाधी ज्यांना बहाल केली, त्यांनी संसदीय आयुधांच्या कार्यव्यवस्थेपासून वंचित राहून नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.राज्य विधिमंडळाचे प्रथमच सदस्य झालेल्या विधानसभा व परिषदेच्या आमदारांचा तीन दिवसांचा अभ्यासवर्ग लोकसभा सचिवालय व ब्युरो आॅफ पार्लमेंटरी स्टडी अ‍ॅण्ड रिसर्चच्यावतीने आयोजित केला आहे. वर्गाला उपस्थित राहण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने केलेल्या पाठपुराव्यानंतर १२० नवीन आमदारांनी संमती कळविली. यामध्ये काही नव्या राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे.सोमवारी दुपारी तीन वाजता लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत उद्घाटन, त्यानंतर केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत एक सत्र असे पहिल्या दिवसाचे नियोजन होते. तीन दिवसांत सात मान्यवरांची व्याख्याने आमदारांना ऐकायची आहेत. सुमारे ३०० लोक बसू शकतील अशा त्या सभागृहात सर्वजण मिळून ५२ जण होते. सुमित्रा महाजन यांनी उद्घाटनाच्या भाषणात अनेक उत्तमोत्तम दाखले दिले. देश, राज्य व आपण हा परस्पर संबंध, लोकप्रतिनिधींसाठी वाचनाचे महत्व कथन केले. गैरहजरीबद्दल लोकमतशी बोलताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, आमदारांची आजची उपस्थिती कमी असली तरी उद्या ती वाढेल अशी अपेक्षा करू. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत अलीकडेच भाजपच्या नवीन आमदारांची चार दिवसांची कार्यशाळा झाल्याने येथील उपस्थितीवर परिणाम झाला असावा असे वाटते. ४विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे व विधिमंडळाचे प्रधानसचिव अनंत कळसे रविवारी दाखल झाले. शंभर आमदार उपस्थित राहणार म्हणून आठवडाभर संपूर्ण नवीन महाराष्ट्र सदन आमदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. पण गेल्या दोन दिवसात विधानसभा व परिषदेचे मिळून २३ आमदारांनी राजधानीतीत हजेरी लावली. ४यामध्ये प्रामुख्याने अनिल सोले, महादेव जानकर, प्रकाश गजभिये, शिरीष चौधरी, डॉ मिलिंद माने व संगीता ठोंबरे या एकमेव महिला आमदारांंचा समावेश आहे. या साऱ्यांनी सकाळी एक तास लोकसभेतीलील प्रेक्षक दीर्र्घेेतून प्रश्नोत्तरांच्या तासाला हजेरी लावली. त्यानंतर लोकसभा आवारात छायाचित्रे काढली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत दुपारी भोजन केले. त्यानंतर उद्घाटनसत्राला हजेरी लावली.