फुटीरवाद्यांसोबत चर्चा सुरूच राहणार

By Admin | Updated: August 21, 2014 02:19 IST2014-08-21T02:19:40+5:302014-08-21T02:19:40+5:30

काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले.

Discussions will be continued with separatists | फुटीरवाद्यांसोबत चर्चा सुरूच राहणार

फुटीरवाद्यांसोबत चर्चा सुरूच राहणार

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले. भारताने मात्र पाकिस्तानच्या या भूमिकेवर सडकून टीका केली. पाकची ही भूमिका सिमला करारातील तरतुदींपेक्षा भिन्न असल्याचे भारताने निक्षून सांगितले. भारताने कठोर भूमिका घेतल्यानंतरही पाकिस्तान मोदी सरकारला जुमानत नसल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे. 
सर्व पक्षांना या चर्चेत सामील करून घेणो गरजेचे आहे, असे वक्तव्य करून पाकिस्तानचे उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी झालेल्या आपल्या भेटीचे समर्थन केल्याच्या काही तासांनंतर भारताने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन म्हणाले, की सिमला करारानुसार काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानचा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि अन्य कोणत्याही मार्गाने हा प्रश्न सुटणार नाही.
भारताने केलेल्या विरोधाला डावलून काश्मिरी फुटीरवाद्यांसोबत आपण चर्चा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अब्दुल बासित यांनी आज व्यक्त केला. या चर्चेमुळे पाक भारतावर कोणते उपकार करीत नाही व भारतही पाकवर कोणते उपकार करीत नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
 
च्श्रीनगर-काश्मीर मुद्दय़ाबाबत फुटीरवाद्यांसोबत चर्चा करण्यात काही गैर नाही, असे मत फुटीरवादी नेते शाबीर अहमद शाह यांनी येथे व्यक्त केल़े  
च्काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय नसून त्रिपक्षीय असल्याचे सांगून, शाह यांनी अशाप्रकारच्या बैठका यापूर्वीही झाल्या असल्याचे म्हटल़े परराष्ट्र सचिवांची बैठक रद्द झाल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे अन्याय्य व लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे. 

 

Web Title: Discussions will be continued with separatists