शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केरळ विधानसभेत धुमश्चक्री

By admin | Updated: March 13, 2015 23:34 IST

भ्रष्टाचाराचे कथित आरोप असलेले केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांना अर्थसंकल्प सादर करू न देण्याच्या इरेस पेटलेल्या विरोधकांनी शुक्रवारी

थिरुवनंतपूरम : भ्रष्टाचाराचे कथित आरोप असलेले केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांना अर्थसंकल्प सादर करू न देण्याच्या इरेस पेटलेल्या विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. मणी अर्थसंकल्प मांडण्यात यशस्वी झाले; मात्र गदारोळादरम्यान विरोधी सदस्यांनी अध्यक्षांचे आसन फेकले. वॉच अ‍ॅण्ड वार्ड स्टाफसोबत विरोधकांची धक्काबुक्की झाल्याने सभागृहात फ्री स्टाईल पाहायला मिळाली.केरळमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. तसेच डावे आणि भाजप विरोधात आहेत.आज मणी अर्थसंकल्प मांडण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी त्यांना जोरदार विरोध केला. भ्रष्ट मंत्री अर्थसंकल्प मांडू शकत नाहीत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. सभागृहातील मार्शलनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले आणि हाणामारी सुरू झाली. संतप्त विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांचे आसन फेकले शिवाय अन्य साहित्याचीही तोडफोड केली. मारहाणीत माकप नेते आणि माजी मंत्री थॉमस आयजकसह एलडीएफचे काही सदस्य खाली कोसळले. काही सदस्य बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून सभागृहाबाहेर नेण्यात आले. विरोधकांचा आक्रमक पवित्रा बघून सत्ताधाऱ्यांनी मणी यांच्याभोवती सुरक्षा कडे निर्माण केले. यादरम्यान मणी यांनी अर्थसंकल्पाचे थोडक्यात वाचन करून तो विधानसभेच्या पटलावर ठेवला.केरळ विधानसभेतील या अभूतपूर्व गोंधळाचे पडसाद शुक्रवारी संसदेतही उमटले. केरळच्या काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत हा मुद्दा उपस्थित केला. (वृत्तसंस्था)