शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांविरुद्ध खटल्यास नकार

By admin | Updated: June 9, 2015 01:01 IST

तब्बल ११ वर्षे चाललेल्या तपासानंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) चार अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करण्याच्या परवानगीबाबत सीबीआयने केलेली विनंती केंद्र सरकारने सोमवारी फेटाळून लावली.

नवी दिल्ली : तब्बल ११ वर्षे चाललेल्या तपासानंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) चार अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करण्याच्या परवानगीबाबत सीबीआयने केलेली विनंती केंद्र सरकारने सोमवारी फेटाळून लावली. ज्या आयबी अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरण्यासाठी सीबीआयने परवानगी मागितली होती, त्या अधिकाऱ्यांमध्ये विशेष संचालक (निवृत्त) राजेंद्रकुमार यांचाही समावेश आहे. हे चारही अधिकारी इशरत जहाँ आणि अन्य तिघांच्या बनावट चकमकीत सहभागी असल्याचा आरोप आहे.सीबीआयतर्फे सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांवर विचार केल्यानंतर गृहमंत्रालयाने सीबीआयची विनंती फेटाळली, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. तथापि नेमक्या कोणत्या आधारावर ही विनंती फेटाळण्यात आली हे मात्र सांगण्यात आलेले नाही. सीबीआयने इशरत बनावट चकमकप्रकरणातील आपला अंतिम चौकशी अहवाल दोन वर्षांआधीच गृहमंत्रालयाकडे सादर केला होता.(वृत्तसंस्था)तत्कालीन संचालकांचाही होता विरोध> आयबीचे तत्कालीन संचालक आसिफ इब्राहीम यांनी आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करण्याला विरोध केला होता. इब्राहीम हे गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच निवृत्त झाले होते. > राजेंद्र कुमार हे १९७९ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. ते दोन वर्षाआधीच निवृत्त झाले. मुंबईत राहणारी १९ वर्षीय इशरत व अन्य तिघांची २००४ मध्ये अहमदाबादजवळ बनावट चकमकीत हत्या झाली त्यावेळी ते अहमदाबाद येथे आयबीचे संयुक्त संचालक होते.> आयबीच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरण्याची परवानगी मिळावी यासाठी केलेली विनंती फेटाळण्यात आल्याचे सीबीआयला कळविण्यात आले आहे.