दिल्ली - मुंबई टॅल्गो ट्रेनची उद्या अंतिम चाचणी

By Admin | Updated: September 9, 2016 13:54 IST2016-09-09T13:54:16+5:302016-09-09T13:54:16+5:30

भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची शनिवारी अंतिम चाचणी होणार आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी घेण्यात येणार असून 150 किमी ताशी वेगानं ट्रेन धावणार आहे.

Delhi-Mumbai Tallgo train final test tomorrow | दिल्ली - मुंबई टॅल्गो ट्रेनची उद्या अंतिम चाचणी

दिल्ली - मुंबई टॅल्गो ट्रेनची उद्या अंतिम चाचणी

>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची शनिवारी अंतिम चाचणी होणार आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी घेण्यात येणार असून 150 किमी ताशी वेगानं ट्रेन धावणार आहे. पहाटे 2.45 वाजता ही ट्रेन दिल्लीवरुन निघणार असून मुंबईत दुपारी 2.29 वाजता पोहोचणं अपेक्षित आहे. टॅल्गो ट्रेनमुळे मुंबई - दिल्ली प्रवास फक्त 12 तासांमध्ये करणं शक्य होणार आहे. 
 
2 ऑगस्ट रोजी टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी झाली होती. दिल्ली ते मुंबई दरम्यान ही चाचणी पार पडली होती. दिल्लीहून रात्री 8 वाजता ही ट्रेन रवाना झाली होती. ट्रेन सकाळपर्यंत मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र गुजरातमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे टॅल्गो ट्रेन मुंबईत 2 तास उशिरानं दाखल झाली होती. या चाचणीत टॅल्गो ट्रेन ताशी 130 वेगानं चालवली गेली. 
 
साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा 200 किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे. कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे. सध्या सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी 16 तास लागतात.
 

Web Title: Delhi-Mumbai Tallgo train final test tomorrow