शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक...., भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:58 IST

India News: भारतातील महिला वेश्या व्यावसायिकांबाबतची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील सर्वाधिक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ह्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि तेलंगाणामधील आहेत.

भारतातीलमहिला वेश्या व्यावसायिकांबाबतची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील सर्वाधिक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ह्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि तेलंगाणामधील आहेत. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये प्रति एक हजार वयस्कर महिलांमागे एफएसडब्ल्यूंची संख्या सर्वाधिक आहे. तसेच भारतामध्ये एचआयव्हीचे रुग्णही सर्वाधिक आहेत. यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष,  ट्रान्सजेंडर आणि इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करणाऱ्या व्यक्तींना एचआयव्हीचा सर्वाधिक संसर्ग झालेला आहे. हा अहवाल प्रोग्रॅमेटिक मॅपिंग अँड पॉप्युलेशन साइज एस्टिमेशनद्वारे तयार करण्यात आला आहे. तसेच पीएलओएस ग्लोबल पब्लिक हेल्थ या नियतकालियामध्ये प्रकाशित झाला आहे.

पीएमपीएसईच्या अध्ययनानुसार देशात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची सर्वाधिक संख्या ही कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये देशातील एकूण संख्येपैकी १५.४ टक्के वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये (१२.०० टक्के), महाराष्ट्रामध्ये (९.६) टक्के, दिल्लीमध्ये (८.९ टक्के) आणि तेलंगाणामध्ये (७.६) टक्के या राज्यांचा क्रम लागतो. तसेच दर  हजार वयस्कर  महिलांमागे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे. येथे हे प्रमाण १७.२४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दिल्ली (१५.४६ टक्के), गोवा (११.६७), चंडीगड (१०.१० टक्के) आणि कर्नाटक (८.३४ टक्के) एवढं प्रमाण आहे.

हे अध्ययन भारतातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ६५१ जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं होतं. या अध्ययनाला प्रोग्रॅमेटिक  मॅपिंग अँड पॉप्युलेशन साइज एस्टिमेशनने केलं होतं. पीएमपीएसईच्या अंदाजानुसार भारतामध्ये एकूण ९ लाख, ९५ हजार, ४९९ एवढ्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. तर ३ लाख ५१ हजार, ०२० एमएसएम, २ लाख ८८ हजार, ७१७ पीडब्ल्यूआयडी आणि ९६,१९३ टीजींचा समावेश आहे.  

टॅग्स :IndiaभारतWomenमहिलाSocialसामाजिक