शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:52 IST

या तपासात आढळून आले आहे की, या आरोपींनी 'सिग्नल' ॲपवर एक ग्रुप तयार केला होता. याचा ॲडमिन मॉड्यूलचा म्होरक्या डॉ. मुझफ्फर होता. तो सध्या फरार आहे. तसेच, डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन हेदेखील या ग्रूपमध्ये होते.


जैश-ए-मोहम्मदच्या फिदायीन मॉड्यूलशीसंबंधित, अटकेत असलेल्या आरोपी डॉक्टरांच्या चौकशीतून आणि त्यांच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासातून तपास यंत्रणांना अनेक धक्कादायक आणि मोठे पुरावे मिळाले आहेत. या तपासात आढळून आले आहे की, या आरोपींनी 'सिग्नल' ॲपवर एक ग्रुप तयार केला होता. याचा ॲडमिन मॉड्यूलचा म्होरक्या डॉ. मुझफ्फर होता. तो सध्या फरार आहे. तसेच, डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन हेदेखील या ग्रूपमध्ये होते.

ग्रूपमध्ये डॉ. उमरची भूमिका सर्वात मोठी - 
तपास यांत्रनांच्या तपासात, या मॉड्यूलमध्ये डॉ. उमरची भूमिका सर्वात मठी आणि महत्त्वाची होती, हे स्पष्ट झाले आहे. तो जेव्हा-जेव्हा अमोनियम नायट्रेट, TATP (ट्रायएसिटोन ट्रायपॅरॉक्साइड) किंवा इतर स्फोटक रसायनं खरेदी करायचा, तेव्हा-तेव्हा त्यासंदर्भात या ग्रूपवर माहिती टाकत असे. यात, ते किती प्रमाणात आहे, स्रोत कुठला आहे आणि पुढील तयारी  काय आहे, आदी माहिती असे. महत्वाचे म्हणजे, अमोनियम नायट्रेट, सल्फर डायऑक्साइडसह बहुतेक स्फोटक रसायने, टाइमर, वायर यांसारख्या गोष्टी उमरनेच खरेदी केल्या होत्या, असे डिजिटल फुटप्रिंट्समधून सिद्ध झाले आहे.

यानंतर, खरेदी करण्यात आलेले स्फोटक साहित्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी डॉ. मुजम्मिलकडे सोपवण्यात आली होती. ही स्फोटके त्याच्या भाड्याच्या घरात हलवण्यात येत होती. स्फोटके सुरक्षित आहेत, हा मेसेज देण्यासाठी मुजम्मिल त्यांचा फोटो काढून ग्रुपवर शेअर करत होता. 

आणखी एका हँडलरचे नाव समोर - 
चौकशीदरम्यान 'जैश-ए-मोहम्मद'शी संबंधित फैसल इशाक भट्ट या हँडलरचे नावही तपासात समोर आले आहे. स्फोटके जमवणे, त्याची चाचणी, तयारी आणि मॉड्यूलशी संबंधित इतर सर्व माहिती डॉ. उमर रोज या हँडलरला देत होता. फरार मुझफ्फर अफगाणिस्तानला गेल्यानंतर, हाच हँडलर संपूर्ण मोड्यूल सांभाळत होता. महत्वाचे म्हणजे, सौदी अरेबियाच्या (+966 कोड) व्हर्च्युअल नंबरवरून हाच हँडलर या मॉड्यूलचे संचालन करत होता. आता याचा खरा चेहरा मोर आण्याच्या दृष्टीनेही तपास यंत्रणा काम करत आहेत.

महत्वाचे म्हणजे, 'फैसल इशाक भट्ट' हे कश्मिरी नाव, तो काश्मिरी असल्याचे भासण्यासाठी वापरले गेले असावे, असी शंका तपास यंत्रणांना आहे. आतापर्यंत तपास यंत्रणांना जैश-ए-मोहम्मदच्या अबू उकाशा, हंजुल्लाह, निसार आणि फैसल इशाक भट्ट ही चार  पाकिस्तानी हँडलर्सची नावे  समोर आली आहेत. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaish-e-Mohammed Module: Doctors' Revelations, Signal App Use Unveiled in Investigation

Web Summary : Investigation reveals Jaish-e-Mohammed module used Signal app. Dr. Umar procured explosives, Dr. Muzammil stored them. Handler Faisal Bhat's role exposed, possibly a Pakistani national operating from Saudi Arabia.
टॅग्स :delhiदिल्लीcarकारterroristदहशतवादीTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान